मेडिकल कॉलेजच्या कामात अडथळा आणणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांवर कारवाई करा : रिपाइं जिल्हाध्यक्ष

0

सातारा/अनिल वीर :  जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजची मान्यता मिळाली आहे. गेली चार वर्षे झालेली आहे. तरीही कुठल्याही प्रकारचे कामाची सुरुवात झाली नाही.तेव्हा विघ्न संतोषी लोकावरती कारवाई करावी.अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व महिला जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांनी केली आहे.

              गेल्या चार दिवसांमध्ये संबंधित कामाबाबत सुरुवात करून ठेकेदाराने करण्यासाठी त्यांच्या लोकांसाठी शेड उभा करायचे काम सुरू असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यामध्ये आडकाठी आणून काम बंद पाडण्याचा घाट घातलेला आहे. सज्जन ठेकेदार व त्यांच्या सुपरवायझरला जे काम दिले आहे.तेव्हा त्या कॉलेजमध्ये राजकारण न करता गोरगरिबांसाठी होत असणाऱ्या कामांमध्ये विघ्न कोणीही आणू नये. तरी प्रशासनाने विघ्न आणणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांवरती कडक कारवाई करावी. संबंधित मेडिकल कॉलेजच्या कामांमध्ये श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले व श्रीमंत छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घालून काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यामधील सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या सर्जरीसाठी पुण्यासारख्या ठिकाणी जावे लागत आहे.तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी मेडिकल कॉलेजचे काम त्वरित सुरू करण्यात यावे.  रिपब्लिकन पक्षांनी नेहमीच जिल्ह्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटच्या हद्दीमध्ये होत असणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्याचपद्धतीने संबंधित मेडिकल कॉलेजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. यासाठीही सातत्याने मागणी केलेली आहे. परंतु,काही विघ्न संतोष लोकांकडून यावरतीही काम सुरू करण्यास दबाव येत आहे.तेव्हा सदरचे काम हे त्वरित सुरू करावे. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांची व गोरगरिबांची होणारी हेळसांड थांबवण्यास मदत होईल. एकंदरच मेडिकल कॉलेजच्या दोन बॅचेस सुरू झालेल्या आहेत.अशा अशायासंदर्भात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईतर्फे आंदोलन छेडण्यात आले.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंतर्फे आंदोलन छेडताना दादासाहेब ओव्हाळ,पूजा बनसोडे, पदाधिकारी व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here