मोटारसायकल वरुन हातभट्टीची वाहतूक करणाऱ्यास महिलांनी पकडले,पोलिसांची माञ बघ्याची भुमिका 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात आज सकाळी आठच्या दरम्यान हातभट्टी दारू विक्रेत्याला दारू देत असताना दक्ष महिला यांनी दारू वाहतूक करत असलेल्या इसमाला व नवीन प्लेटिना कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 17 सी क्यू 8401 हे दारू विक्री त्याला दारू देत असताना रंगी हात पकडले परंतु हातभट्टी दारू देण्यास आलेला इसम हा मोटरसायकल टाकून पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.पोलिसास पाचारण केले माञ पोलिसाने बघ्याची भुमिका घेतली.

         प्रसादनगर ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे जिल्हा प्राथमिक शाळा आहे व मारुती मंदिर आहे अशा 25 ते 30 फुटाच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय चालत आहे. हा दारू व्यवसाय बंद व्हावी यासाठी प्रसाद नगर मधील महिलांनी विविध आंदोलन केले आहे. यामध्ये अनेक वेळा रस्ता रोको आंदोलन केले आहे. परंतु या दारू धंद्यावाल्यांवर कोणताही पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला दिसत नाही. अनेक वेळा रस्ता रोको आंदोलन करूनही हे राहुरी फॅक्टरी येथिल प्रसाद नगर परिसरातील दारू धंदे काही बंद व्हायचं नाव घेत नाही. अनेक वेळा निवेदन देऊनही हे दारू धंदे बंद झाले नाही. यामुळे महिला आक्रमक झाल्या या दारूमुळे अनेकांचे संसार  उध्वस्त झाले आहे. 25 ते 30 वर्षाचे मुले सुद्धा या दारूच्या व्यसनाधीन झाले आहे. अनेक तरुण मुलांचे संसार उध्वस्त झाले आहे. तर अनेक तरुण मुलांना हे दारूचे व्यसन लागले आहे. या महिलांनी आक्रमक होऊन जेव्हा ही मोटरसायकल पकडली त्यावेळेस हातभट्टीची वाहतुक करणारा फरार झाला व ही मोटरसायकल देवळाली प्रवरा येथील दारू विक्रेत्याची असल्याची चर्चा परिसरात मध्ये चालू होती. ही सर्व माहिती राहुरी पोलिस स्टेशनला कळताच  राहुरी पोलीसचे हवालदार ज्ञानदेव पालवे हे घटनास्थळी दाखल झाले मोटरसायकल व दारूचे ड्रम यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस हे दारू विक्रेत्यावर व दारू वाहतूक करणारा यांच्यावर काय कारवाई करत आहे. या सर्वांचे लक्ष लागले आहे.

          दारुबंदी मोहिमेत कविता साळवे, लताबाई जगताप, अलका पठारे, अंजू बोर्डे, रंगुबाई मोकळ, दिपाली पंडित, लक्ष्मीबाई पंडित, संगीता साळवे, शोभा पाटोळे, परिगाबाई सरोदे, मनीषा आल्हाट, आर पी आय वडार समाज संघटनेच्या शकुंतला ताई डुकरे, तसेच कांतीलाल उल्हारे, सामाजिक कार्यकर्ते शरद साळवे, दिलीप धिवर, आसाराम आल्हाट, नितीन पुंड, दिलीप जगताप व राष्ट्रवादी युवा शहर अध्यक्ष विक्रांत पंडित आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here