उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी भारत सरकारच्या ई-श्रम कार्ड ची नोंदणी व नॅशनल पेन्शन योजना (NPS) ची नोंदणी शनिवार दिनांक 24/09/2022 रोजी सकाळी 9.30 ते 5.30 या कालावधीत उरण तालुक्यातील कॉमन सर्विस सेंटर कोप्रोली येथे मोफत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोफत शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन कॉमन सर्व्हिस सेंटर कोप्रोली -उरण तर्फे करण्यात आले आहे. नोंदणी साठी येताना नागरिकांनी ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व कोणताही चालू मोबाईल नंबर घेऊन स्वतः व्यक्ती येणे आवश्यक आहे. आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसला तरी चालेल. घर कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, फेरीवाला, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, दुकानदार, खाजगी सेवक, इतर असंघटित कामगार यांच्यासाठी या योजना असून शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा भविष्यात लाभ मिळणार आहे. ई-श्रम नोंदणी केल्यावर पहिल्या वर्षी 2 लाखाचा विमा मोफत मिळणार, नोंदणी केलेल्यांना व्यवसायासाठी लाभ मिळणार व इतर वेळोवेळी अनेक फायदे आपोआप मिळणार आहेत असे विविध फायदे ई श्रम कार्डचे आहेत. याच दिवशी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेतला जाणार आहे. नागरिकांनी ई-श्रम कार्ड व नॅशनल पेन्शन योजना (NPS)चे कार्ड त्वरित काढावेत व भविष्यात कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालिका स्मिता म्हात्रे यांच्याकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी कॉमन सर्विस सेंटर, (CSC) आधार सेंटर, युनियन बँके जवळ, कोप्रोली-उरण. फोन नंबर 9004763339 येथे संपर्क साधावे.
मुंबई प्रतिनिधी : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चेहर्याच्या ओळखीवर आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच...
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहर ते कोपरगाव रेल्वे रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वृक्ष जाळून खाक झाले आहे. दरम्यान तेथून...