देवमाणूस फेम रुक्मिणी सुतार यांचा सत्कार

सातारा/अनिल वीर : जिल्हा अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे महाराष्ट्र महासचिव राजाभाऊ माने,मार्गदर्शक अरुण शेलार,जिल्हाध्यक्ष लालासो. आवटे,कार्याध्यक्ष प्रशांतभाऊ खांडेकर,उपाध्यक्ष मंगेश नामदास आदींच्या अधिपत्याखाली मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न झाले.
येथील होलार समाज संघटनेच्यावतीने डाॅ. मनोहर डोळे मेडीकल फाऊंडेशन, पुणे यांच्यावतीने मोफत नेत्र तपासनी शिबिर संपन्न पार पाडले.जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीचा कार्यक्रम, सातारा चालक श्री. बुवासाहेब सातारकर निर्मित देवीच्या गाण्याचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.यावेळी देवमाणुस फेम सरूआज्जी सौ. रूख्मिणी सुतार,नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष पिंटू गोळे, युवराज करवले, शरद शेलार, मानसिंग शेलार,किरण गोळे, शंकर खांडेकर,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : देवमाणुस फेम सौ. रुक्मिणी सुतार यांचा सत्कार करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)