![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/image-11.png)
मोरबी इथल्या मच्छू नदीवरील दुर्घटनेप्रकरणी गुजरात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. राजकोटचे पोलीस महासंचालक अशोक यादव यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
भारतीय दंड विधानच्या कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची नावं खालीलप्रमाणे आहेत. 1. दीपकभाई नवीन चंद्र पारेख (वय 44)- ओरेवा कंपनीचे मॅनेजर
2. दिनेश भाई मनसुख भाई दवे- ओरेवा कंपनीचे मॅनेजर
3. मनसुख भाई वालजी टोपिया (वय 59)- तिकीट क्लार्क
4. मदेभाई लाखा भाई सोलंकी- तिकीट क्लार्क
5. प्रकाश भाई लालजी भाई परमार- ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर
6. देवांग भाई प्रकाश भाई परमार (वय 31) ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर
7. अल्पेश गोहिल- सेक्युरिटी गार्ड
8. दिलीप गोहिल- सेक्युरिटी गार्ड
9. मुकेश भाई चौहान- सेक्युरिटी गार्ड
मोरबीची सोमवारची सकाळ
गुजरातच्या मोरबी नदीवर रोज जशी सकाळ असते, तसं वातावरण सोमवारी (31 ऑक्टोबर) नव्हतं. सोमवारी सकाळी इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख होतं.
![मोरबी नदी](https://ichef.bbci.co.uk/news/640/cpsprodpb/7759/production/_127435503_mediaitem127455808.jpg)
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी म्हटलं, “या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. 6.45 पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती.
त्यांनी पुढे सांगितलं, “मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले आणि त्यांनी इतर व्यवस्था पाहिली. काही तासातच विविध दलाच्या 200 हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.”