मोरबी पूल दुर्घटनेत राजकोटच्या खासदाराच्या कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

0

मोरबी : गुजरातच्या मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत राजकोटचे खासदार मोहन कुंडारिया यांच्या 11 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.

मोहन कुंडारिया यांनी सांगितलं की, “माझ्या मेव्हण्याच्या भावाच्या चार मुली, तीन जावई आणि पाच मुलं. 11 मृतदेह मिळाले आहेत. एक बाकी आहे.”

राजकोटचे खासदार मोहन कुंडारिया
फोटो कॅप्शन,राजकोटचे खासदार मोहन कुंडारिया

या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफसह इतर बचावकार्य पथकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे

पूल व्यवस्थापन समितीविरोधात आयपीसी कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातच्या गृहमंत्र्यांनी काय म्हटलं?

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी म्हटलं, “या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. 6.45 पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती.”

त्यांनी पुढे सांगितलं, “मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले आणि त्यांनी इतर व्यवस्था पाहिली. काही तासातच विविध दलाच्या 200 हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.”

मोरबीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मते आतापर्यंत 170 जणांना वाचवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here