युथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र आणि विजय विकास सामाजिक संस्था रायगड आयोजित किक बॉक्सिंग कॅम्प उत्साहात संपन्न.

0

उरण दि १(विठ्ठल ममताबादे ) युथ कराटे स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र आणि विजय विकास सामाजिक संस्था रायगड यांच्या वतीने दिनांक २७/१०/२२ ते ३०/१०/२०२२ रोजी,पाली-परळी, घरत फार्म येथे घेण्यात आलेला कराटे किक्कबॉक्सिंग कॅम्प मोठ्या उत्साहाने  पार पडला.

या कॅम्पमध्ये उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या कॅम्पमध्ये २५ सीनियर ब्लॅक बेल्ट उपस्थित होते.

या कॅम्पमध्ये एकूण ९ नवीन विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्ट परीक्षा घेऊन त्यांना ब्लॅक बेल्ट शोदान ही पदवी देण्यात आली.

या कॅम्पला प्रमुख पाहुणे म्हणून किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष  निलेश शेलार , बाॅल कॉर्पोरेशन इंडिया या कंपनीचे प्लांट हेड मॅनेजर  अजित शर्मा, किकबॉक्सिंग असोसिएशन पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष शुभम कानडे,किकबॉक्सिंग असोसिएशन पुणे सिटी चे व्हाईस प्रेसिडेंट राम सर तसेच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

या कार्यक्रमासाठी सिनियर इन्स्ट्रक्टर म्हणून  दीपक घरत,विकास भोईर, संतोष मोकल,मिलन जाधव, प्रगती भोईर, जयेश चौगुले, योगेश पाटील,विशाल सर,सुनील ठाकूर,अविनाश गावंड,तुळशीराम मुकादम,प्रकाश म्हात्रे,पांडुरंग पाटील,किरण भोपी, सुमित भालेकर, वैभव रहाते,नंदकुमार मोकल, मनीष पाटील,

कुमारी. दीक्षा जैन तसेच मॅनेजिंग टीम मधील संतोष मोकल, शुभम म्हात्रे, प्रितम मोकल ,कंकेश गावंड ,कमलाकर म्हात्रे, अजय हेगडकर ,केदार खांबे ,अभिषेक चौगुले,आकाश भिडे, किरण हरगिडकर , दीप म्हात्रे आणि उमंग तांडेल उपस्थित होते.

या तीन दिवसीय कॅम्पमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली आहे.ऋग्वेद जेधे, प्रथमेश राठोड ,शार्दुल सावंत ,जिग्नेश म्हात्रे, अजय हेगडकर, वेद शिवकर, हंसिका मोकल,सायली शेडगे आणि सौम्या पिंपळे यांनी ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली. या कॅम्पमध्ये मुलांना कराटे, किकबॉक्सिंग, जुडो बेल्ट रेसलिंग , सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here