येवला (प्रतिनिधी) –
ढोलीला ढोल रे वगाड मारे…तेरे बिना श्याम हमारा नहीं कोई रे…पंखीडा उडी जाना पावा गड रे… या दांडिया-गरबा फेम गीतांसह अनेक रिमिक्स गीतावर लयबद्ध नृत्याविष्कार सादर करत येवल्यातील अनेक महिला व तरुणींनी नवरात्रोत्सवानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित भव्य दांडिया गरबा स्पर्धेचा नूर अधिकच बहारदार केला..येथील राधा मोहिनी ग्रुपने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले…!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील आसरा लॉन्स येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित दांडिया-गरबा स्पर्धेने स्पर्धत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत दांडियाचा नृत्याविष्कार सादर केला.स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिरीष नांदुर्डीकर अध्यक्षस्थानी होते तर कुणाल दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपीठावर सुनील शिंदे,दिनेश आव्हाड,नितीन काबरा,विकास गायकवाड,जयवंत खांडेकर,कल्पेश पटेल,दीपक गुप्ता
जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुरेखा दराडे,आशा दराडे,मीना दराडे,प्रियंका काकड,स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता दराडे,अनिता दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उस्फूर्त सहभागामुळे सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली स्पर्धा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती.विशेष म्हणजे स्पर्धेत राधाकृष्ण,राजवंशसिंग कारडा, कालिका महिला मंडळ,राधा मोहिनी रासलीला,गुज्जू रॉक्स,इंडियन,स्पार्कल, राकेश तडवी,नवरंग डान्स,मेकॅनिकल रॉक्स,ऑनटाइम परफॉर्मन्स,एनडीबीआर या १४ ग्रुपने सहभाग नोंदविला होता.मात्र स्पर्धा इतकी रंगत गेली की ऐनवेळी महिलांच्या तीन ग्रुप्सने देखील या ठिकाणी नृत्याविष्कार सादर केला.
एरव्ही हातात दांडिया घेऊन नृत्य करणाऱ्या तरुणी या दृश्यांच्या पलीकडे जाऊन अतिशय नाविन्यपूर्ण फ्युजन देखील या स्पर्धेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाले.राजवंशसिंग कारडा,राधामोहिनी, गुज्जू रॉक्स,नवरंग,कालिका महिला, रासलीला या ग्रुपने केलेले नृत्याविष्कार डोळे दिपवणारा होता.उल्हासपूर्ण आणि उत्स्फूर्त वातावरणात प्रथमच स्पर्धा झाल्याने महिलांनी त्याचा पुरेपूर आनंद लुटला.
● यांनी पटकावले बक्षिसे..!
सुंदरशी वेशभूषा करून अप्रतिम आविष्कार करणाऱ्या राधा मोहिनी ग्रुपने स्पर्धेचे पहिले ११ हजार रुपयांचे बक्षिस पटकावले.दुसऱ्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस नवरंग डान्स ग्रुपने तर तिसऱ्या क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे बक्षीस गुज्जू रॉक्स ग्रुपने पटकावले. याशिवाय कालिका महिला मंडळ,राजवंशसिंग कारडा,राकेश तडवी,रासलीला ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.अमृता गुजराथी,पारुल गुजराथी व आश्लेषा गुजराथी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.विजेत्यांना कुणाल दराडे तसेच सौ.दराडे व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या हस्ते रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्तविक स्वप्नील बाकळे यांनी तर सूत्रसंचालन संतोष विंचू यांनी केले.
फाउंडेशनचे गौरव पटेल,मंदार पटेल, किरण कुलकर्णी,हारून शेख,विजय गोसावी,मकरंद तक्ते,इम्रान शेख,सुमित गायकवाड,राहुल गुजराथी,अतुल घटे, लक्ष्मण गवळी,अरुण गायकवाड,योगेश लचके,संजय गायकवाड,सुनील पवार,
रामेश्वर भांबारे,कुणाल क्षीरसागर,राजू वाडेकर,राहुल राठी,आत्मेश विखे,
मोहफिस अत्तार,मयुर मेघराज,मंदार खैरे,अक्षय राजपूत,शेखर शिंदे,मयुर वाळूंज,राहुल भांबारे,नचिकेत जाधव, किरण बोरणारे,हेमंत भुजबळ,अभिषेक खांबेकर,प्रशांत जाधव,सिद्धेश धिवर आदींनी संयोजन केले.
●उत्सवप्रियता जपण्याचा प्रयत्न – दराडे
दिवाळीला रांगोळी,पतंगोत्सव,दसरा होळी,रंगपंचमी हे सर्वच सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची परंपरा शहराने जपली आहे. ही परंपरा अव्यातपणे सुरू राहावी, नव्या पिढीनेही शहराची जगप्रसिद्ध ख्याती जपावी तसेच महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. महिलांकडूनही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने आम्हाला उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा मिळते.दांडिया स्पर्धेतील उस्फुर्त सहभागाने आयोजनाचा हेतू सफल झाला.दिवाळीत भव्य रांगोळी स्पर्धा ही आयोजित केली जाणार असून येवला,लासलगाव,विंचूरसह ग्रामीण भागातही वेगळेवेगळे स्पर्धा फाउंडेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणार असल्याचे यावेळी कुणाल दराडे यांनी सांगितले.