उरण दि 27 ( विठ्ठल ममताबादे ) दिपावली निमित्त रंगवली कलादर्शन उरण तर्फे उरण शहरातील एन आय हायस्कूल येथे भव्य रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी सुरु आहे.रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ कलाकार नंदकुमार साळवी यांच्या हस्ते सोमवार दि 24/10/2022 रोजी झाले. सदर रांगोळी प्रदर्शन हे सर्व नागरिकांना दिनांक 30/10/2022 पर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.थ्रीडी रांगोळी, व्यक्तीचित्र , निसर्गचित्र असे विविध प्रकाराचे रांगोळी काढण्यात आले आहेत.नंदकुमार साळवी, दर्शन पाटील , सिद्धार्थ नागवेकर, संतोष डांगरे, नवनित पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, स्वप्नाली मणचेकर, कीर्तिराज म्हात्रे आदि कलाकांरानी उत्कृष्ठ असे रांगोळी काढून प्रेषकंची मने जिंकली आहेत. कलाकारांची कला जनते समोर यावी. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावे. दिवाळी मध्ये नागरिकांना रांगोळी कलेचा आनंद लुटता यावा या दृष्टीकोनातून उरण मध्ये रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आल्याचे सांगत जास्तीत जास्त नागरिकांनी हे रांगोळी प्रदर्शन आवर्जुन पहावे असे आवाहन नंदकुमार साळवी, राजेश नागवेकर यांच्यासह अन्य कलाकारांनी केले आहे.