राजरत्न समाज उन्नती महिला मंडळ पदाधिकारी निवडीसह सत्कार

0

सातारा/अनिल वीर : सम्राट अशोकनगर, म्हावशी येथे राजरत्न समाज उन्नती महिला मंडळाची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.त्या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

                राजरत्न समाज उन्नती मंडळातर्फे धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी एस.बी.जाधव, मनोज व्यवहारे, अनिल मोहिते, रविंद्र गवळी, संजय दाभाडे आदींच्या उपस्थितीत राजरत्न समाज उन्नती महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला जितेंद्र दाभाडे व त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार भंते विद्रोही बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.अनिल तानाजी दाभाडे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दहा खुर्चीचा संच राजरत्न बुद्ध विहारास सुपुर्द करण्यात आला.भिमराव दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवनिर्वाचित महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला जितेंद्र दाभाडे, उपाध्यक्षा बेबीताई सुरेश दाभाडे, सचिव दिपाली विनोद दाभाडे, उपसचिव लोचना संजय दाभाडे, कोषाध्यक्ष श्रीमती शीतल उदय दाभाडे,सदस्य मंगल महेंद्र दाभाडे, रेषा पंकज दाभाडे रेखा नथुराम दाभाडे,छाया प्रकाश दाभाडे आदी उपासिकासह उपासक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

फोटो : नवनिर्वाचित महिला मंडळाचा सत्कार करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here