राज्यात भारतीय बौद्ध महासभेच्या परीक्षा एकाच वेळेस होणार आहेत : भोसले

0

सातारा : भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य यांच्या परीक्षा ठिकठिकाणी होणार आहेत.तेव्हा एकाच दिवशी व वेळेस होणार आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष भागवत भोसले यांनी दिली.

            येथील सांस्कृतिक भवन, मिलिंद कॉलनी येथे एक दिवशीय बौद्धाचार्य परीक्षा तयारी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.तेव्हा जिल्हाध्यक्ष भागवत भोसले (पश्चिम) मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब जाधव (पूर्व) होते.धम्मबांधव उत्सव कमिटीचे संस्थापक अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

     प्रारंभी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अनुक्रमे अनिल वीर व बाळासाहेब जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भागवत भोसले व नंदकुमार काळे यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी सामुदायिक पद्धतीने घेण्यात आला.सदरच्या आजी-माजी  शिबिराचा अध्यक्ष,सदस्य, श्रामणेर, बौध्दाचार्य,इच्छूक सदस्य व संपुर्ण कार्यकारणी यांनी सुवर्ण संधीचा लाभ घेतला. बौध्दाचार्य परीक्षेत प्रवेश घेण्याचा आहे. त्यांनी वही-पेन घेऊन उपस्थिती नोंदवली होती.वरिष्ठांनी केलेल्या मार्गदशनानुसार सकारात्मक चर्चा-विनिमय करण्यात आला. 

 जिल्हाध्यक्ष तसेच नंदकुमार काळे (जिल्हा संस्कार उपाध्यक्ष) व विद्याधर गायकवाड (जिल्हा कोषाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या रविवार दि.३० रोजी सातारा जिल्ह्यातील सकाळी १० वा. महाविहार, कराड येथे परीक्षा होणार आहेत. तेव्हा बौद्धाचार्य म्हणून परिक्षेस  बसणाऱ्या व श्रामणेर झालेल्या  बौद्धाचारी परिक्षार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये परिक्षेचे स्वरूप त्याचबरोबर सराव प्रश्नसंच व श्रामणेर शिबीरादरम्यान अभ्यासलेल्या विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचा लाभ संदीप जाधव (गुणरन्त) तांदुळवाडीत, ता. कोरेगाव,मनोज वाघमारे (संघरत्न) शेंद्रे,ता. सातारा, संदीप कांबळे (धम्मानंद)नागठाणे ता. सातारा, कुमार सुर्वे(शिलरत्न) खोजेवाडी, ता.सातारा,दिलीप फणसे (संघकिर्ती) मांडवे ता. सातारा, मंगेश डावरे (संघानंद) सातारा यांच्यासह माजी श्रामणेर यांनीही लाभ घेतला.

फोटो : महानव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अनिल वीर व बाळासाहेब जाधव शेजारी भागवत भोसले व नंदकुमार काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here