राञीच्या अंधारात तो आला आणि रेकी करुन गेला

0

धष्टपुष्ट जोडीदारा समवेत येवून धुमाकुळ घातला. त्याच्या धुमाकाळास त्याने विरोध केला म्हणून त्या दोघांनी त्याला जिवे ठार मारले.

देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक डाँ.विश्वास पाटील यांच्या घरी घडली घटना.

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी राजेंद्र उंडे         

             देवळाली प्रवरा येथिल एका वस्तीवर राञी 1 वा तो शिकारी साठी आला, त्याने वस्तीची पाहणी अर्थात रेकी केली.पुन्हा एक ते दिड तासाने आपल्या धष्टपुष्ट  जोडीदारास घेवून शिकार करण्यासाठी आला. त्या दोघांनी वस्तीवर धुमाकुळ घालण्यास सुरवात केली. त्या दोघांना धुमाकुळ घालण्यापासुन रोखण्यासाठी त्याने आपली ताकद पणाला लावली.त्या दोघांच्या ताकदी समोर त्याचा एकट्याचा निभाव लागला नाही. त्या दोघांनी त्यास ठार करुन फाडून टाकले. हा सर्व आखो देखो हाल देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक डाँ.विश्वास पाटील यांनी पाहिला.त्या धष्टपुष्ट दोघांची ताकद पाहुण  डाँ.पाटील यांनी एक पाऊल माघारी टाकला. पण रोनी माञ शेवटच्या झणापर्यंत झुंज देत राहिला आणि शेवटी ताकद कमी पडल्याने त्या दोघांनी डाव साधला.टोनीला जीवानीशी जावे लागले.दोन धष्टपुष्ट बिबट्याच्या ताकदी पुढे टोनी नावाचा कुञा हरला. त्या दोघांनी त्या ठार करुन अवघे पन्नास फुटावर नेले. कुञ्यास जास्त केस असल्यामुळे बिबट्याला रोनीवर ताव मारता आला नाही.डाँ.पाटील यांनी मोठ्या दुःखद अंतकरणाने शेतातच त्याचा अंत्यविधी केला.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा - दवणगाव रस्त्यालगत देवळाली प्रवरा नगर पालिकेचे  माजी नगरसेवक डाँ.विश्वास पाटील यांची वस्ती असुन मोठी वस्ती असल्याने डाँ.पाटील यांनी रोनी नावाचा पन्नास हजार रुपये किमंतीचा कुञा पाळलेला होता.हा कुञा त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनला होता.सोमवारी  राञी 1 वा.वस्तीवर बिबट्याने प्रवेश केला. त्याने वस्तीची सर्व पाहणी अर्थात रेकी करुन घेतली. तो बिबट्या रेकी करीत असताना डाँ.पाटील यांनी खिडकीतून हा सर्व प्रकार पाहिला. रेकी नंतर तो बिबट्या निघुन गेला सुमारे एक ते दिड तासाने त्या बिबट्याने धष्टपुष्ट जोडीदारा समवेत वस्तीत प्रवेश केला. त्या दोन्ही बिबट्याने धुमाकुळ घालण्यास सुरवात केली. डाँ.पाटील यांचा टोनी नामक कुञ्याने माञ दोघांनाही विरोध करण्यास सुरवाथेत केली.टोनीने सुमारे 45 मिनिटे त्या दोन बिबट्यांना विरोध चालू ठेवला.परंतू त्या दोन बिबट्याच्या ताकदी पुढे टोनीचा टिकाव लागू शकला नाही.त्या दोघांनी टोनीस ठारमारले.

            गेल्या काही दिवसांपासून देवळाली प्रवरा परिसरातील वाड्या वस्त्यांवर बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे. परीसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा  लावण्याचीअनेक दिवसा मागणी केली जात आहे.बिबट्याने माणसावर हल्ला केल्यावर पिंजरा लावणार का असा सवाल येथिल शेतकऱ्यांनी केला आहे. बिबट्या दररोज एका एका वस्तीव हल्ला करुन येथिल कुञे व पशुधनावर हल्ला करुन ठार मारीत आहे. हे वन विभागाला माहित असतानाही शेतकऱ्यांस वन विगाकडे अर्ज करण्यास सांगतात. त्या पिंजऱ्यात बिबट्यासाठी  सावज ठेवायची जबाबदारी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. यावरुन वन विभागाचे काय करायचे तुम्ही करा या भानगडीत आम्हाला अडकवू नका असे तर त्यांना सागायचे तर नसेल ना? 

          बिबट्याच्या हल्ल्या नंतर डाँ.पाटील यांनी  वनविभागाचे सतिष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता. बिबट्याने हल्ला करुन पन्नास हजार रुपयांचा कुञा ठार केला असल्याची माहिती दिली. यावेळी जाधव यांनी सांगितले की मी सध्या पार्थर्डी येथे बंदोबस्तासाठी आहे. आमचे मजुर कर्मचारी येवून पाहुण जातील.परंतू  बिबट्याच्या हल्ल्यात कुञा मेला आहे.त्याचा पंनामा करत नाही.कुञ्यास कोणतीही भरपाई मिळत नाही. पाळीव पशू धनास भरपाई मिळते. या भागात पिंजरा लावायचा असल्यास वन विभागात अर्ज दाखल केल्या नंतरच पिंजरा लावला जाईल असे जाधव यांनी सांगिले.    

                सोमवारी रात्री विश्वास पाटील यांच्या टोनी नामक पाळीव कुत्र्यावर दोन बिबट्याने हल्ला चढविला. दोन्ही बिबटयाना प्रतिकार करण्याचा प्रयत्न टोनीने केला. मात्र दोघांपुढे टोनीची ताकद कमी पडली आणि त्याला गतप्राण व्हावे लागले. अतिशय प्रामाणिक असलेल्या टोनी हा पाळीव कुत्रा मृत झाल्याने पाटील कुटूंबियांनी शोक व्यक्त करत आपल्या घराजवळील शेतात त्याला दफन करून अखेरचा निरोप दिला. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, मी माझ्या मुलापेक्षा जास्त जीव टोनी या पाळीव कुत्र्यास लावत होतो. आज आमच्या कुटुंबातील एक व्यक्तीच गेल्याचे

दुःख आमच्या संपूर्ण कुटुंबाला आहे.असे डाँ.पाटील यांनी सांगितले.

                  दरम्यान मानवी वस्तीत बिबट्याने प्रवेशा करुन पशुधना बरोबर पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनखात्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here