रायगड जिल्हा मर्यादित फ्रिस्टाईल जलतरण स्पर्धाचे आयोजन

0
उरण दि. 18 ( विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विजय भोईर व उद्योजक विकास भोईर या दोघा जुळ्या भावांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोरगरिबांना अन्नदान, गरजूना मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,रक्तदान आदी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत उरण शहरातील विमला तलाव, उरण स्विमिंग पूल येथे विजय विकास सामाजिक संस्था नवघर-उरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा स्तरीय फ्रि स्टाईल जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल गोल्ड मेडलिस्ट कोच हितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार असून माजी खासदार रामशेठ ठाकूर,आ.प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी, उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here