चाचा तनपूरे नेमके कोणत्या पक्षात, खासदार डॉ. सुजय विखेंना पडला प्रश्न.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी रविवारी राहुरी शहरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी अद्याप प्रवेश केला नाही, याची खंत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्वतःला विखे समर्थक म्हणवून घेणारे चाचा तनपुरे हे नेमके कोणत्या पक्षात आहेत, याबाबत तालूक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या अडिच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इन कमींग सुरू होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडला. आणि पून्हा भाजपाची सत्ता आली. आठ दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे यांना कॅबिनेट चे महसूल मंत्रीपद मिळाले. जिकडे सत्ता तिकडेच भत्ता अशी खुणगाठ मनाशी बाळगून असलेले कार्यकर्ते पून्हा भाजपाकडे वळाले. गेल्या आठ दिवसांपासून भाजपाकडे पून्हा गर्दी वाढली. याच्या वेदना होत असल्याची खंत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी चाचा तनपूरे नेमके कोणत्या पक्षात आहेत. हा प्रश्न खासदार सुजय विखे यांना पडला होता. कारण चाचा तनपूरे यांनी अद्याप भाजपात प्रवेश केला नाही. मात्र भाजपाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहतात. चाचा तनपूरे यांची नौटंकी आता जनतेसमोर उघड होत आहे. त्यामुळे चाचा तनपूरे यांचे पुढील राजकीय भविष्य अंधारात असल्याची चर्चा तालूक्यातील जनतेमधून सुरू झाली.विकास मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले. विखे, तनपुरे यांना कायम विरोध करणारे विकास मंडळ अस्तित्व न राहिल्यामुळे परखड असा विरोधक कोण असा प्रश्न राहुरी तालुक्यातील जनतेला पडला आहे.
कै. रामदास धुमाळ यांच्या नंतर विकास मंडळाची धूरा रावसाहेब उर्फ चाचा तनपूरे यांच्यावर आली होती. मात्र चाचा तनपूरे यांच्या नाकर्तेपणामुळे विकास मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले. चाचा तनपूरे यांनी कधी विकास मंडळ, कधी इंदिरा काॅलेज, कधी भाजप तर कधी विखे गटात राहून स्वतःचा फायदा करून घेतला. मागील नगरपरिषद निवडणूकीत राहुरी शहरातील जनतेने त्यांना साफ नकार दिला. अशावेळी त्यांनी पाच वर्षे सत्ताधारी तनपूरे यांच्या विरोधात राहिले. पाच वर्षांत त्यांनी शहरवासीयांचे कोणतेच प्रश्न मांडले नाहीत. मागील पाच वर्षांत माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाचे सहा नगरसेवक होते. त्यांनाही वाऱ्यावर सोडून चाचा तनपूरे यांनी पाच वर्षे मौनव्रत धारण केले होते. पाच वर्षे मुग गिळून बसलेल्या चाचा तनपूरे यांना नगरपरिषद चा कार्यकाळ संपताच जाग आली. आणि त्यांनी विरोध करायला सुरूवात केली. मात्र पाच वर्षे चाचा तनपूरे हे कोठे होते. असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.