रावसाहेब दानवेंना पैठण विधानसभेतून मताधिक्याने विजयी करणार – मंत्री सांदीपान पाटील भुमरे

0

पैठण,दिं.१६.(प्रतिनिधी): जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा.रावसाहेब पाटील दानवे Raosaheb Danve यांना पैठण विधानसभा मतदार संघातील जनता भरभरून मतदान करेल. सर्वात जास्त मताधिक्य पैठण विधानसभेतून असेल असे प्रतिपादन पैठणचे आमदार छ.संभाजीनगर चे पालकमंत्री सांदिपान पाटील भुमरे Sandipan Patil Bhumre यांनी केले. 

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर, जालना लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई, मनसे, रासप, रयत क्रांती व  इतर मित्रपक्षाच्या महायुतीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज पैठण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. शिवसैनिक, भाजप, राष्ट्रवादीकॉग्रेस व मित्रपक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकष्टा करुन रावसाहेब पाटील दानवेंना सहाव्यांदा खासदार करुन दिल्लीला पाठवतील. जालना लोकसभा क्षेत्रांत दानवे साहेबांनी केलेला विकास, आणलेले विकास प्रकल्प, मोठ्या प्रमाणावर झालेली रस्त्याची गुणवत्तापुर्ण कामे आणि राज्यसरकार व केंद्रसरकार ने राबवलेल्या जनकल्याणकारी योजना यामुळे जनता जाहिर पणे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीकॉग्रेस व मित्रपक्षांना जाहिर समर्थन करत आहे. असे शेवटी बोलतांना मंत्री भुमरे पाटील म्हणाले.

  यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि भारत सरकारचे रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, संदिपानजी भुमरे ( कॅबिनेट मंत्री रो. ह. यो तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर ), विलास संदीपानजी भुमरे (चेअरमन रेणुका देवी सहकारी साखर कारखाना , पैठण ) सुहास शिरसाठ (जिल्हाध्यक्ष भाजप छ. संभाजीनगर ),  रमेशजी पवार  ( जिल्हाध्यक्ष शिवसेना छ. संभाजीनगर ) कैलास पाटील ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छ. संभाजीनगर ) दत्तात्रय म्हेत्रे ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष छ. संभाजी नगर ) संजयजी ठोकळ  (जिल्हाध्यक्ष री. पा. ई. आठवले गट छ. संभाजीनगर) लक्ष्मणराव औटे ( तालुकाध्यक्ष , भारतीय जनता पार्टी ), अण्णाभाऊ लबडे (तालुकाध्यक्ष शिवसेना), विजयभाऊ चव्हाण ( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ), जगन्नाथ साळवे ( तालुकाध्यक्ष री. पा. ई. आठवले गट ),  गोरक्ष मोरे (तालुकाध्यक्ष , महाराष्ट्र नवनिर्माण सेना), दत्तात्रय नेमाने  ( तालुकाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष )  पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, पैठण विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.सुनिल शिंदे, जिल्हासरचिटणीस कल्याण गायकवाड, महिला आघाडीच्या रेखा कुलकर्णी, लोकसभा विस्तारक गणेश फुके, निवडणूक प्रमुख ॲड विजय औताडे, विधानसभा विस्तारक बाप्पा शेळके, विशाल पोहेकर,वैभव पोहेकर, किशोर तावरे,शहादेव लोहारे, विष्णू खंडागळे, गणेश वाघमोडे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, शाखाप्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here