राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष

0

आजचा दिवस

शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण सप्तमी , सोमवार , दि. ४ डिसेंबर २०२३, चंद्र – सिंह राशीत, नक्षत्र – मघा,  सुर्योदय- सकाळी ६ वा. ५८ मि. , सुर्यास्त-   सायं. १७ वा. ५९ मि. 

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत रहाणार आहे. आजचा दिवस वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – मंगळ केन्द्रयोग, चन्द्र – बुध त्रिकोणयोग, चंद्र – गुरु त्रिकोणयोग, चंद्र – शुक्र लाभयोग व चन्द्र – शनी प्रतियोग होत आहेत. षडाष्ट्कयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक, धनु व कुंभ या सर्व राशींना अनुकूल तर कन्या, मकर व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

           दैनंदिन राशिभविष्य Today’s horoscope

मेष  : काहींना विविध लाभ होणार आहेत. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी  होतील. तुमचा दबदबा राहील.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्‍वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे.

सिंह : आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल.

कन्या : काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. अस्वस्थता राहील.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

धनु  : मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्य जपावे.

कुंभ  : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात.

मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. प्रतिकूलता जाणवणार आहे.

आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here