राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम 

0

कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर २०२२

            संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव विधानसभा मतदार संघात शहर व तालुका भाजपाच्यावतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ करण्यांत आल्याची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिली. 

           देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवुन वृक्ष लागवड करण्यांत आली, ज्येष्ठ नागरिकांना अमृत महोत्सवी स्वातंत्रानिमीत्त शिंदे फडणवीस शासनाने मोफत बससेवा योजना सुरू केली त्याचा सुरक्षीत लाभ ज्येष्ठांना देत असल्याबददल कोपरगांव आगारातील बस चालक व वाहकांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

           <p>युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील प्रलंबित समस्या सोडविण्याच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेवुन केंद्र व राज्य स्तरावर असणा-या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी तळागाळापर्यंत जाउन त्यांना विविध फॉर्मचे वाटप करून त्यानुरूप प्रस्ताव तयार केले आहेत. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून विविध समाजउपयोगी अभियान राबवुन उपेक्षीतांना त्याचा लाभ मिळवुन दिलेला आहे.

           राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोंबर रोजी असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित केला असुन त्याची तंतोतंत अंमलबजावणी कोपरगांव विधानसभा मतदार संघात केली जात आहे. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी अलिकडेच भेट देवुन येथील कामकाजाचा आढावा घेतला आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत जे काम केले ते अद्वितीय असुन जगात त्याला तोड नाही. त्यांचा वाढदिवस संपुर्ण भारत देश एकसंघ होवुन साजरा करीत आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सेवा पंधरवाडयात आपापल्या प्रभागातील तसेच गावातील प्रलंबित विकास कामे पुर्ण करण्यासाठी जीव तोडुन काम करावे व हे अभियान यशस्वी करावे असे शहराध्यक्ष दत्तात्रय काले म्हणाले. 

          <p>याप्रसंगी सर्वश्री.विजयराव आढाव, वैभव आढाव, शिवाजी खांडेकर, दिपक चौधरी, युवा मोर्चातालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,युवामोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, राजेंद्र बागुल,किरण सुपेकर,विजय वाजे,हरीभाऊ लोहकणे,पिंकी चोपडा, खालीकभाई कुरेशी,सतिष रानोडे,सोमनाथ आहिरे,सोमनाथ म्हस्के,जगदिश मोरे, स्वप्निल निखाडे,दिपक जपे, ज्ञानेश्वर सिनगर, सुशांत खैरे, सतिष चव्हाण, संतोष कदम, दत्तात्रय डोंगरे, विलास लकारे, अनिल गोडसे, अर्जुन मोरे, जॉनसन पाटोळे, राजू वैद्य,बाबासाहेब साळुंके,विष्णूपंत गायकवाड, वैभव गिरमे,दिनेश कांबळे, प्रमोद नरोडे, रहीम शेख, राजेंद्र बागुल, कानिफनाथ गुंजाळ, राहूल सुर्यवंशी,बाळासाहेब निकम, हेमंत निकम, रेवनाथ निकम, रविंद्र निकम, लहू निकम, संदीप निकम, अविनाश गायकवाड, बाबासाहेब नेहे, प्रभाकर नेहे, बाळासाहेब पाचोरे, संतोष नेरे,मुकेश गायकवाड,दत्तात्रय कोळपकर,संतोष साबळे,विजय गायकवाड,रोहीदास पाखरे,गोपी सोनवणे,सुनिल पांडे,विशाल सोनवणे,मुकुंद उदावंत,जॉन गोरे,फकीर मंहमद विजय गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटोओळी-कोपरगांव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवुन वृक्ष लागवडीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व सर्व पदाधिका-यांनी केला. यावेळी कोपरगांव आगारातील बस चालक व वाहकांचा सत्कार करण्यांत आला. 

(छाया- विमल फोटो, कोपरगांव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here