राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेजमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा

0

कोपरगाव शहरामध्ये फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून केली जनजागृती

कोपरगाव प्रतिनिधी : 

_________________

जागतिक फिजिओथेरपी या दिवसाची स्थापना १९५१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर हा दिवस ८ सप्टेंबर १९९६ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तसेच हा दिवस जागतिक भौतिक चिकित्सा समुदायाची एकता दर्शवितो. या दिवशी फिजिओथेरपिस्टच्या कार्याबाबत जागरूकता वाढवण्याचा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी या क्षेत्रातील लोकांना आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कौशल्य वाढवणे यावर अधिक भर देण्यात आला.याचे निमित्त साधून कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड हायवे लगत असणाऱ्या कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी कॉलेजमध्ये जागतिक फिजिओथेरपी  दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक फिजिओथेरपी  दिवसा निमित्ताने फिजिओथेरपी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.यात भोतिकोउपचार जनजागृती रॅली,

<p>”एक ना सूरज,बोलना नीरज,व फिजिओथेरपी ही तर काळाची गरज” अश्या उत्सहापूवर्क घोषणा देत कोपरगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने सर्व कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेतले.तसेच भौतिक उपचाराची जनजागृती विषयक पदनाट्य सदर करण्यात आले. वास्तव गणेश मंडळ कोपरगाव व वक्रतुंड गणेश मंडळ कोपरगाव अश्या विविध ठिकाणी हे पदनाट्य सादर करण्यात आले. तसेच शिक्षक दिनानिमित्त बरेच भाषणे,नाट्य,नृत्य,प्रदर्शित करून शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले होते. विशेष म्हणजे या सप्ताहाची शोभा वाढविण्यासाठी फिजिओथेरपी कॉलेज अंतर्गत एक मोफत भौतिको उपचार शिबीर आयोजित केले होते. या शिबिरा मार्फत बऱ्याच गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळाले. व भौतिक उपचाराची सविस्तर माहिती देण्यात आली. या पूर्ण सप्तहात काम करत करतांना कशी काळजी घ्यावी यांची संपूर्ण माहिती श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना, संस्थेतील सुरक्षा रक्षक, कामगार,यांना देण्यात आली.या सप्तहात प्रश्नमंजुषा आणि वाद विवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजेत्यांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे,प्रसाद कातकडे,विजय कडू, दीपक कोटमे,डॉ. इरशाद अली,डॉ. अरुण सर,डॉ.दीपक शर्मा,डॉ. महेंद्र सिंग, डॉ. तय्यबा मुन्नावर,डॉ.रुदाली हुसळे,डॉ. बीबी मरियम,डॉ. बीबी फातिमा,प्राजक्ता रहाणे,वैभव शिंदे,मोनेश्वर शिंदे,पंकज जगताप,सचिन भिंगारे, जयहरी वाघ,प्रवीण गायकवाड  व सर्व फिजिओथेरपी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

____________________________________________

                                 फोटो ओळी

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी कॉलेज मधील विद्यार्थी कोपरगाव मध्ये जनजागृती भव्य रॅली आयोजित करतांना सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद दिसत आहे

Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here