राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक ह्रदय दिवस साजरा

0

नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  केले कार्यक्रमाचे नियोजन

कोपरगाव :- जागतिक हृदय दिवस हा 29  सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जातो.याचेच औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील नामवंत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग कॉलेजमध्ये 29 सप्टेंबर रोजी जागतिक ह्रदय दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाअंतर्गत डॉ.अभय दगडे व डॉ.ह्र्दयरोग तज्ञ निरज काळे यांनी विदयार्थ्यांना आरोग्याची व हृदयाची काळजी कशी घ्यायची याविषयी मोलाचे समोपदेशन केले तसेच  एम.डी मेडिसिन एस जे एस हॉस्पिटल डॉ.सायली ठोबरे यांनी ही विदयार्थ्यांना  ह्रदयाशी निगडीत विविध आजाराची सर्व माहिती दिली.

      जागतिक हृदय दिवस या अनुशंगाने एस.जे.एस हॉस्पिटल व आर.जे एस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने उद्या दिनांक ३० सप्टेंबर रोजी नाऊर ता.श्रीरामपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर मेळावा आयोजित केला होता.यात दोनशे पेक्षा अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्रमात नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य,उपप्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आर.जे.एस फाउंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे, सेक्रेटरी प्रसाद कातकडे, ह्र्दयरोग तज्ञ डॉ.नीरज काळे, एम.डी.मेडिसिन सायली ठोंबरे,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य,फिजिओथेरपी कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, एस. जे.एस हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी नर्सिंग कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here