राष्ट्रीय जीवन आजीविका मिशन अंतर्गत मोठीजुई शाळेत महिला स्वयंसहाय्यता गटांनी भरविले विविध प्रकारचे स्टॉल्स.

0

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुका  पंचायत समिती एनआरएलएम विभाग  अंतर्गत ग्रामपंचायत मोठी जुईच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथे गावातील विविध स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे दिवाळी निमित्ताने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ व वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले.  या कार्यक्रमाचे उदघाटन सुरेंद्र पालव – सांख्यिकी विस्तार अधिकारी उरण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित एनआरएलएम टीमचे मदने सर, आरोग्य सहायक अजय पाटील, मोठीजुई शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अश्विनी लहू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तृप्तीताई बंडा ,माजी सरपंच आशा ताई भोईर,  CRP करुणा ताई आणि काजल ताई तसेच ग्रामपंचायत व SMC सदस्य,  शाळेतील सर्व  शिक्षक वृंद , विद्यार्थी वर्ग व ग्रामपंचायत मधील सर्व स्वयं सहायता समूह उपस्थित होते.

यावेळी बऱ्याच प्रकारच्या खाद्य पदार्थ, दिवाळी उपयुक्त साहित्य व फराळ साहित्य,कपडे,मिठाईचे स्टॉल, मच्छीफ्राय भाकरी इ.स्टॉल्स लावण्यात आले होते.शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय होळकर  तर निवेदन व आभार दर्शन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here