राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे उरण मध्ये पथसंचलन.

0

उरण, दि 16(विठ्ठल ममताबादे) हिंदूचे जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सुपरिचित आहे.सर्व जाती धर्माचे व्यक्ती आज संघात कार्यरत आहेत. संघाच्या एकूण महत्वाच्या कार्यक्रमा पैकी पथसंचलन हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी पथसंचलनाचे आयोजन संपूर्ण देशात करण्यात येते.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही दरवर्षी पथ संचलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी उरणमध्ये रविवार दि 16 ऑक्टोबर 2022 रोजी उरण शहरात सकाळी 9 वा. पथसंचलन काढण्यात आले.सर्वप्रथम सर्व स्वयंसेवक उरण शहरातील देऊळवाडी येथील संघस्थान येथे एकत्र जमले. एकत्र जमल्यानंतर संघाची प्रार्थना झाली. त्यानंतर देऊळवाडी येथून पथसंचलनाची सुरवात झाली.हे पथसंचलन देउळवाडी, गणपती चौक – राजपाल नाका- चारफाटा-बालई- बाझारपेठ – राजपाल नाका स्वामी विवेकानंद चौक, एन आय हायस्कूल मार्गे परत मूळ स्थानी देऊळवाडी या मार्गाने पथसंचलन झाले. यावेळी 54 स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेश घालून यात सहभाग घेतला व इतर 19 मान्यवर असे एकूण 73 स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. सदर पंथसंचलन शांततेत व मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उरण तालुका कार्यवाह- दर्शन पाटील,सह-कार्यवाह- भरत पाटील,मुख्यशिक्षक- गोपाल प्रजापती,जिल्हा संपर्क-श्रीपाद कातरणे,जिल्हा कार्यालय प्रमुख- स्वप्निल रावते,जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख- पुष्कर सहस्त्रबुद्धे,व्यवस्था प्रमुख-पुरुषोत्तम सेवक, भारतीय जनता पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक राजू ठाकूर,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक (गुन्हे) सुहास चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलिस कर्मचारी-युवराज जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here