देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शाहमद शब्बीर शेख यांच्यावर ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील मुलनमाथा येथिल 30 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या बाबत सविस्तर माहिती अशी तक्रारदार यांचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल असून सदर अदखलपात्र गुह्यात तक्रारदार यांचे वर तहसिल कार्यालय, राहुरी येथे चॉप्टर केस करण्यात आली असून, सदर चॉप्टर केस मध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात यातील आरोपी पोलीस नाईक/१५६७ शाहमद शब्बीर शेख, या लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे दि.१३ आँक्टोबर रोजी पाच हजार रुपयेंची लाच मागणी केली. पडताळणी दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन येथे पंच साक्षीदार समक्ष तड़जोड अंती ४०००/- ₹ ची मागणी केली.शुक्रवारी दुपारी आरोपी पोलीस नाईक/१५६७ शाहमद शब्बीर शेख या लोकसेवक यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर,यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहायक सापळा अधिकारी शरद गोरडे,पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगुल, पोना रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख, राहुल डोळसे. आदी सहभागी झाले होते.