राहुरीत बनावट औषध साठा प्रकरण

0

२३पैकी ६ आरोपी अटक, राहुरीतील डॉक्टर ही रडारवर!

गुजरात,हिमाचल प्रदेश पर्यंत तपास.

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

               राहुरी शहरात मागील महिन्यात सापडलेल्या दीड कोटी हून अधिक किमतीच्या बनावट औषध प्रकरणाचा तपासाने चांगलीच गती घेतली असून या प्रकरणात आतापर्यंत  २३ जणांचा सहभाग निस्पन्न झाला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे, यातील एक आरोपीला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे.या घटनेचे धागे दोरे गुजरात व हिमाचल प्रदेश पर्यंत पसरले आहेत. राहुरी पोलिसांचे एक पथक सध्या हिमाचलं प्रदेश मध्ये ठाण मांडून आहे.अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी शरहातील अनेक मेडिकल दुकानदार व डॉक्टर या प्रकरणी पोलिसांच्या रडारवर आहेत.

      <p>  राहुरी शहरात ३ ऑगस्ट रोजी उपाधीक्षक संदीप मिटके,पोलिस निरीक्षक  प्रताप दराडे यांचे पथकाने छापा मारून सुमारे दीड कोटीहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त केला. पोलिसांनी सर्व प्रथम जमील महेबूब शेख (वय२३) व अक्तर चांद शेख (वय२२) रा राहुरी या दोघांना अटक केली.

    अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाचे मदतीने ही औषधे बनावट असल्याची शहानिशा  करून तस्करी  कोठे कोठे सुरू होती? या तस्करीत कोण कोण सामील आहेत? औषधी कोठे तयार केली?कोणकोणत्या डॉक्टर ने वापर केला? या सर्व बाबींचा तपास सुरु असून अहमदाबाद येथील कॅडीला कंपनीने ही औषधे आम्ही बनवले नसल्याचा निरवळा दिला आहे.राहुरी पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेशात तपास करीत आहे. पोलीस तपासात दिवसेंदिवस गुन्हेगारांची व्याप्ती वाढत असून स्वतःला प्रतिष्ठित समजणारे अनेक मेडिकल चालक,डॉक्टरांचा याप्रकरणात सहभाग दिसून येत आहे.पोलीस खात्री करूनच त्यांना आरोपी करीत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर लोकांनी या औषधाचा मोठ्या प्रमाणवार वापर केल्याचे तपासात पुढे येत आहे.

       या प्रकरणात नौशाद शेख यास पुण्यातून तर इम्रान सोरटीया यास गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून जेरबंद केले आहे.

*चौकट *

एकाला हि सोडणार नाही;पो.नि.दराडे

            जप्त केलेल्या प्रतिबंधित औषध साठयात विशेषतः गर्भपात,व उतेजित करणाऱ्या बनावट औषधांचे मोठे प्रमाण आहे,विशेष म्हणजे अनेक बेकायदा गर्भपात करण्यासाठी अनेक डॉकटरांनी याचा वापर केला आहे.या बोगस औषधामुळे अनेक अल्पवयीन मुलींना शाररीक अपंगत्व आले असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या यातील एक ही आरोपीला सोडणार नाही असा चंग तपास अधिकारी राहुरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here