देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी येथील नगर-मनमाड माहामार्गालगत राहुरी कॉलेजकडे जाणाऱ्या कमानीजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाले असल्याने पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.
लोंखडी गज, एक रस्सी असा एकूण ४० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणातील दोन अनोळखी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
याबाबत सहायक फौजदार पोपट कटारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.
राहुरी कॉलेज परिसरात पोपट शंकर शेलार वय-29 वर्षे (मुळ रा. चांदा ता. नेवासा जि.अ.नगर ह.रा. शाहुनगर, राहुरी बुद्रुक ता. राहुरी,) संतोष राजु शेलार वय-25 वर्षे (रा. इंगळे वस्ती, शाहुनगर, राहुरी बुद्रुक ता राहुरी,) सोमा मोहन बर्डे (वय-22 वर्षे (रा. आण्ण शेटे वस्ती, शाहु नगर, राहुरी बुद्रुक ता. राहुरी) व दोन अनोळखी इसम १८ सप्टेंबर च्या रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्यांना पकडले असून त्यांच्याकडून ४० हजार रुपये किं. एक काळ्या रंगाची होंडा कंपनीची विनानंबरची मोटरसायकल, एक चाकु लोखंडी मुठ,
ReplyReply allForward |