राहुरी तालुक्यातील कणगर,वडनेर,गुहा परिसरात ढग फुटी सदृश पाऊस

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील कणगर,वडनेर,गुहा परिसरात ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले आहे तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पहाटेच्या सुमारास विजेंच्या कडकडासंह कणगर,गणेगाव, गुहा, वडनेर, परीसरात मेघ राजाने हजेरी लावली गणेगाव परिसरात अनेक बंधारे फुटल्याने वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान गणेगाव येथुन गुहा हद्दीतील नगर-मनमाड मार्गावरील पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.गुहा येथील बिरोबा तलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान या पाण्यामुळे गुहा, देवळाली प्रवरा रस्ता वाहून गेला आहे.दरम्यान या परिसरारात पाऊसामुळे मोठे नुकसान झाल्याने प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी राहुरीचे तहसीलदार एफ. आर.शेख यांच्याशी संपर्क करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना व मदत करण्याची मागणी केली त्यानुसार राहुरीचे निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी, सचिन औटी, टी. बी.शिंदे, श्री.जाधव, श्री. चौघुले,श्री. अविनाश ओहोळ,गुहा कोतवाल बापू आदींनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.ऐन दिवाळीच्या तोंडावर शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी  केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here