राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावच्या जयेशच्या चंद्रा गाण्यास नेटकऱ्यांची पसंती

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

               गेल्या काही दिवसांपासून ‘चंद्रा’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला भूरळ पाडली आहे. हेच गाणं राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील रहिवासी जयेश खरे चिमुकल्याने अगदी पल्लेदार आवाजात आपल्या शालेय वर्गात गायले आणि हा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सर्वजण त्याच्या आवाजाचं कौतुक करीत आहे.

          खेड्या गावातील  वाजूंळपाई ता.राहुरी येथील चिमुकला जयेश खरे हा इयत्ता ६ वीत शिक्षण घेतो. वर्गात गायलेल चंद्रा गाण शिक्षक कृष्णा राठोड यांनी अपलोड केल्यानंतर तो सर्वत्र व्हायरल झाला. या गाण्याने सर्वांना भुरळ घातली आहे.  जयेश खरे याच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परिस्थितीमुळे स्वतःला मोठं गायक होता आलं नाही मात्र आपल्या मुलाला मोठा गायक करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न आहे.

           जयेश यास वडील विश्वास खरे, संगीत शिक्षक सुनील पारे यांचे तर जयेश यास पहिले व्यासपीठ निर्माण करुन देणारे सोनु साठे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच करजगाव ता.नेवासा येथिल छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.परदेशी कलाशिक्षक सुभाष चारुडे तसेच वांजुळपोई येथील मराठी शाळेतील शिक्षक  सुरेश गिऱ्हे,  सचिन हरिश्चंद्रे, ललिता कल्हापुरे त्यास कलेस नेहमी प्रोत्साहन देत आहे. 

       संपूर्ण महाराष्ट्रात जयेश याने गायलेलं चंद्रा गाणे व्हायरल झाल्यानंतर आज तो त्याच्या शाळेत परतल्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी जयेश याने पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करत वर्गमित्रांनी कौतुक केले.

          जयेश याने काही महिण्यापुर्वी   ‘मी होणार सुपरस्टार’, छोटे उस्ताद या कार्यक्रमात आपल्या आवाजाचा जलवा दाखवत १८ व्या फेरीपर्यंत पोहचला होता. गायक आदर्श शिंदे, सचिन पिळगांवकर, गायिका वैशाली सामंत यांची वाहवा मिळविली  होती. जयेशच्या गाण्यांनी

उत्साहित होऊन आदर्श शिंदेंना यांना सुद्धा जयेशबरोबर गाणे गाण्याचा मोह आवरला नाही. ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ हे गाणे त्याच्याबरोबर गायले होते. जयेश. चे वडील विश्वास खरे हे मजुरी करून एका ऑर्केस्ट्रामध्ये काम काम करतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here