राहुरी नगरपरिषदेच्या कंपोस्ट खत प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतूक

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

          राज्याच्या हरीत महासिटी कंपोस्ट विषयक प्रदर्शन स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मुंबई येथे आयोजित प्रदर्शनामध्ये राहुरी नगरपरिषदेच्या कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. राहुरी नगरपरिषदेचा आदर्श नगरविकास खात्यासाठी मोलाचे असल्याचे कौतूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्वच्छ अभियान (नागरी) 2.0 च्या शुभारंभप्रसंगी हरीत महासिटी कंपोस्ट विषयावरील प्रदर्शनासाठी राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर व स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. 29 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष लक्ष वेधले ते राहुरी नगरपरिषदेच्या कंपोस्ट खत निर्मिती प्रोजेक्टने. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्याधिकारी बांगर व स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांकडून प्रकल्पाची माहिती व निर्मित खतांची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापणामध्ये राहुरी नगरपरिषदेने चांगली कामगिरी केल्याचे कौतूक मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

यासह नाबार्ड या केंद्र शासन संस्थेचे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धन रावत यांनीही घनकचरा व्यवस्थापणाच्या कामकाजाचे कौतूक केले. खत निर्मिती करून राहुरी नगरपरिषदेने आदर्श निर्माण केला आहे. राहुरीच्या घनकचरा व्यवस्थापण व कचरा डेपोची पाहणी करण्यास येणार असल्याचे रावत यांनी आश्‍वासन दिले. याप्रसंगी खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापण व खत निर्मितीची माहिती घेतली. राहुरी नगरपरिषदेच्या पथकामध्ये मुख्याधिकारी बांगर यांसह स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी सुभाष बाचकर, अमोल गायकवाड, सोशल लॅबचे प्रतिनिधी प्रकाश पठाडे, बालाली कदम यांनी प्रदर्शनामध्ये प्रकल्पाचे सादरीकरण केले.

माजी खासदार प्रसाद तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनात व राज्याचे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या नियोजनाअंतर्गत पालिका प्रशासनाने उभारलेले कचरा डेपो व खतनिर्मिती प्रकल्प लक्षवेधी ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here