राहुरी फॅक्टरीतील ‘वैष्णवी चौक’च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

0

राहुरी फॅक्टरी : येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही नवरात्रोत्सव निमित्तान दि.२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिकव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या निमित्तान स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तर देवी भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येते. यंदाही नऊ दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. देवीची प्रतिस्थापना व घटस्थापना देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,मुख्याधिकारी अजित निकत,वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेश आप्पा दोंड,श्रीकांत शेठ चांडक आदींच्या हस्ते संपन्न होणार आहे. मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सायं ५ वा. आंबिकानगर येथील आराध्या मंडळाच्या वतीने देवी गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर या कालावधीत रात्री ९ वा. स्वर्गीय गं.भा.रंजना बाई सर्जेराव शिंदे यांच्या स्मरणार्थ रामायणचार्य हभप संदीप महाराज चेचरे (लोहगावकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय तुलसी रामायण सत्संग सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सर्जेराव शिंदे यांचे सौजन्य लाभणार आहे.

शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. वैष्णवी चौक परिसरातील महिलांच्या वतीने दुर्गा सप्तशती वाचन पार पडणार आहे. रात्री ९ ते १० वेळेत शिवचरित्रकार युवा प्रबोधनकार प्रथमेश वर्धावे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बजरंग नाना जाधव यांचे प्रायोजकत्व लाभणार आहे. त्यांनंतर रात्री १० वा. वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वा. लहान मुलांसाठी स्लो सायकल स्पर्धा पार पडणार आहे.याच दिवशी रात्री ८ वा. कै. गुलाबराव राणूजी मोढवे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय भारूडकार तसेच मुंबई दूरदर्शन व झी टॉकीज फेम हमीद सय्यद प्रस्तुत भारुडाचे रंगी हा विनोदी भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी ओम गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे गणेश गुलाब मोढवे यांचे सौजन्य लाभणार आहे.

रविवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. महिला व तरुणींसाठी रांगोळी स्पर्धा तसेच रात्री ९ वा. डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. स्थानिक कलावंतांचा नाट्य रुपी अविष्कार सबसे बडा कलाकार संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी राहुरी एमआयडीसी येथील उद्योजक बाबासाहेब अण्णासाहेब देठे यांचे सौजन्य लाभणार आहे.

मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा.होम हवन महायज्ञ याच दिवशी रात्री ८ वा. नवरात्र कालावधीत पार पडलेल्या स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.

बुधवार ५ ऑक्टोबर रोजी देवीची भव्य मिरवणूक व विसर्जन संपन्न होणार आहे.याशिवाय दररोज रात्री महिलांसाठी रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्र काळात पार पडणाऱ्या स्पर्धांसाठी विविध मान्यवर,देणगीदार यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी या कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here