रिपब्लिकन सेनेची पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

सातारा/अनिल वीर  :- रिपब्लीकन सेना पुर्व  सातारा जिल्ह्यात येणाऱ्या कोरेगाव, माण,खटाव,फलटण व खंडाळा तालूक्यातील प्रमूख कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीत दहिवडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.तेव्हा विस्तारीत कार्यकारिणी निवडण्यात आली.

          रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांच्याबरोबर विचार विनीमय केल्यानंतर  सातारा पुर्व जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रियेची अधिकृत घोषणा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी जाहीर केली आहे. पुर्व जिल्हा उपाध्यक्षपदी     अजीतराव बापूराव साठे (खटाव), बजीरंग भगवान वाघमारे (माण ) ,सुनीलराव जयवंत खरात (खंडाळा ), जिल्हा सचिवपदी अर्जून उत्तमराव भालेराव (खटाव),जगन्नाथ महादेव वाघमारे (कोरेगाव ), अशोकराव सुरेश पवार (माण) जिल्हा कोषाध्यक्षपदी दिनकर श्रीपती जगताप (फलटण),जिल्हा संघटकपदी दादासाहेब कुंटे ( खंडाळा), चंद्रकांत गोपाळराव गायकवाड व जिल्हा सदस्य म्हणून राहूलजी दिलीप गायकवाड (फलटण ),अमरराव रामचंद्र खरात (माण ),प्रतीक प्रफूल मोरे (कोरेगाव ) आदी पदाधीकारी यांच्याही सर्वानूमते निवडी करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, जिल्हा युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी  प्रभारी म्हणून जीतराव सरतापे ( माण ) तर जिल्हा महासचीवपदी नितीन भोसले यांच्यावर जबाबदारी दिली असून लवकरच विस्तारीत कार्यकारीणी  निवडण्यात येणार आहे. 

         रिपब्लीकन सेनेचे सर्वेसर्वा  आनंदराज आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या मानसापर्यंत पोहचवून सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तालूका, जि.प. पं.स. व  बुथपर्यंत कार्यकर्ते जोडण्याचे काम एका दिलाने करावे.असेही सर्वानुमते ठरविण्यात आले.सदरच्या सभेस प. सदस्य गणेश कारंडे,संतोषराव घाडगे, कांतीलाल खुंटे, भाऊसाहेब मोहोड, शहाजीराव लोखंडे, बाळासाहेब काळे, विजयराव मोरे,कृष्णाथ केजळे, विकास मोरे,सुर्यकांत कांबळे, अजीत मोरे,जयवंत काकडे,बाळू वाघमारे,अमर उमापे,निखील भिसे,दिगंबर वाघमारे,महादेव लोखंडे,स्वपनील भोकरे आदी प्रमूख कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.पूर्व जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. महासचिव सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र आवटे यांनी  आभारप्रदर्शन केले.

फोटो : जिल्हा पूर्व रिपब्लिकन सेना पदाधिकारी यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here