सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवाय, सातारा जिल्हाध्यक्षपदी सुभाष गायकवाड (पूर्व विभाग) व विशाल भोसले(पश्चिम विभाग) यांच्याही नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याध्यक्ष डी.सागर, उपाध्यक्ष युवराज धसवाडीकर व संजय देखणे व संघटक यशवंत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई याठिकाणी सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
जिल्हयाचे पूर्व व पश्चिम अशी विभागणी केल्याने पूर्व जिल्हाध्यक्षपदी सुभाष गायकवाड यांची वर्णी लागली असून जिल्हा महासचिवपदी सुनील कदम यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी नितीन भोसले,दादासाहेब कांबळे, गणेश कारंडे,श्रीरंग वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुळातच जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे विशाल भोसले यांना पश्चिम विभागीय जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. इतरांच्याही नियुक्त्या विस्तारीत कार्यकारिणीत करण्यात आलेल्या आहेत.यावेळी पाटण तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, सिद्धार्थ देवकांत, पै.आकाश भोसले,संतोष उघडे,मनोज कांबळे, किरण अडसूळ,रमेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचितमधून बाहेर पडून नुकतीच वंचित संघर्ष मोर्चाची स्थापना चंद्रकांत खंडाईत यांनी केली होती. अल्पावधीत जिल्ह्यात कामही सुरू झाले होते. मात्र, रिपब्लिकन सेनेत विलीनीकरण कारण्यात आले आहे.सर्व टीमचे स्वागत राज्य पदाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेचे कार्य नक्कीच विस्तारणार आहे.पुन्हा एखदा नवीन इनिंगसाठी जिल्हाध्यक्ष गायकवाड व भोसले यांना कार्यकर्त्यानी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
फोटो : जिल्हा पदाधिकारी सुभाष गायकवाड,सुनील कदम यांना नियुक्तीपत्र देताना राज्य पदाधिकारी शेजारी खंडाईत, भोसले,वाघमारे व इतर.(छाया-अनिल वीर)