रिपब्लिकन सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत 

0

सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सातारा जिल्हा पूर्व अध्यक्षपदी सुभाष गायकवाड याचीही नियुक्ती करण्यात आली असून सातारा पश्चिम विभागीय  जिल्हाध्यक्षपदी पूर्वीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे विशाल भोसले यांना जबाबदारी दिली आहे.इतरांच्याही नियुक्त्या विस्तारीत कार्यकारिणीत करण्यात आलेल्या आहेत.

  वंचितमधून बाहेर पडून नुकतीच वंचित संघर्ष मोर्चाची स्थापना केली होती. अल्पावधीत जिल्ह्यात कामही सुरू झाले होते. मात्र,मुंबई येथे रिपब्लिकन सेनेत वंचित संघर्ष मोर्चाचे विलीनीकरण करून खंडाईतआप्पासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी जाहीर प्रवेश केला आहे.सर्व टीमचे स्वागत पक्षाचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.यावेळी सुनील कदम,सुभाष गायकवाड,गणेश कारंडे,श्रीरंग वाघमारे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.त्यामुळे जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेचे कार्य नक्कीच विस्तारणार आहे.पुन्हा एखदा नवीन इनिंगसाठी वंचित नाराज कार्यकर्त्यानी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here