सातारा/अनिल वीर : रिपब्लिकन सेनेतर्फे पुर्व जिल्हा कोरेगाव, खटाव, माण,खंडाळा व फलटण तालुक्यातील जिल्हा कार्यकारणीच्या निवडीसाठी गुरूवार दि.२७ रोजी दुपारी १२ वाजता दहीवडी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांनी दिली.
सातारा जिल्ह्याचे दोन भाग करून पुर्व आणी पश्चिम असे दोन विभाग करण्यात आले आहेत. तेव्हा सबंधीत पदाधिकारी व कार्यकर्त्यानी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन पुर्व सातारा जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड व महासचीव सुनील कदम यांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी निवडी केल्यानंतर उर्वरीत जिल्हा पदाधीकारी यांच्या निवडी करण्याकरीता रिपब्लीकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य गणेश कारंडे यांच्या प्रमूख उपस्थीतीत होणार आहेत. तेव्हा प्राथमीक स्वरूपात प्रत्येक तालूक्यातून दोन ते तीन कार्यकर्त्यांची निवड जिल्ह्यावर करून त्यांना जबाबदारीची पदे दिली जाणार आहेत.तदनंतर तालूका विभागीय दौरा निश्चित होणार आहे.दि. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत तालूका कार्यकारणी तालूकावर सहविचार सभा घेऊन कार्यकारिणी निर्माण होणार आहेत. तेव्हा त्या नियोजनार्थ दहिवडी येथे होणाऱ्या सभेस उपस्थित रहावे. यासाठी संतोष घाडगे, राजेंद्र आवटे आदी पदाधिकारी अथक असे परिश्रम घेत आहेत.