रुपयाने गाठली नीचांकी पातळी ; आयात महागल्याने महागाई भडकणार !

0

मुंबई : रुपया पुन्हा एकदा डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया (Rupee) घसरल्याने खनिज तेल , आणि इतरही वस्तूंची आयात महाग होऊन देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता अनिर्माण झाली आहे. जगातील मंदीचा (World recession) परिणाम आता भारतात (India) दिसण्यास सुरवात झाली आहे. याचा सर्वसामान्य जनतेला चांगलाच फटका बसू शकतो.

सध्या चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेने (RBI) ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी रुपयाची घसरण (Rupee Vs Dollar) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी डॉलरची विक्री केल्याचीही चर्चा आहे.
गेल्या ट्रेडिंग आठवड्यात, भारतीय रुपयाने प्रथमच ८१ची पातळी ओलांडली आणि नवीन विक्रमी नीचांक (८१.२४) ला स्पर्श केला. २३ सप्टेंबरला तो १२५ पैशांनी घसरून ८०.९९ प्रति डॉलरवर बंद झाला, तर १६ सप्टेंबरला तो ७९.७४ वर बंद झाला.

महागाई वाढण्याची भीती

विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्चे तेल आणि इतर वस्तूंची आयात महाग होईल. त्यामुळे महागाई वाढेल. भारत ८५ टक्के तेल आणि ५० टक्के गॅस आयात करतो. रुपयाच्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत इंधनाच्या किमतीवर होऊ शकतो.

भारतातील खाद्यतेलाची गरजही आयातीतून भागवली जाते. मिलर्सची संघटना असलेल्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (Solvent Extractors Association of India) कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता म्हणतात की रुपयाच्या घसरणीमुळे आयात खाद्यतेलाची किंमत वाढेल.

शेवटी याचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. इक्रा रेटिंग्सच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे चलनवाढीवर अनुकूल परिणाम रुपयाच्या घसरणीमुळे काही प्रमाणात होईल.

भारताची व्यापार तूट ऑगस्टमध्ये २७.९८ अब्ज डॉलरवर

ऑगस्ट २०२२ मध्ये वनस्पती तेलाची आयात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४१.५५ टक्क्यांनी वाढून $1.८९ अब्ज झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये भारताची व्यापार तूट दुपटीने वाढून $२७.९८ अब्ज झाली. या वर्षी ऑगस्टमध्ये पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादनांची आयात वार्षिक ८७.४४ टक्क्यांनी वाढून $१७.७ अब्ज झाली आहे.

मध्यवर्ती बँकेची रणनीती काय आहे?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कोणतीही केंद्रीय बँक सध्या आपल्या चलनाचे अवमूल्यन थांबवू शकत नाही. आरबीआय मर्यादित कालावधीसाठी रुपयाची घसरणही करू देईल, असे अहवालात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, रुपयाच्या मूल्यात ही घसरण देशांतर्गत आर्थिक मूलभूत तत्त्वांमुळे नव्हे तर डॉलरच्या मजबूतीमुळे झाली आहे.

RBI ने डॉलर विकले

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी डॉलरची विक्री झाल्याची बातमी आहे. तीन व्यापाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सरकारी बँकांमार्फत डॉलरची विक्री केली.

रुपयाच्या विक्रमी घसरणीनंतर आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. एका खाजगी क्षेत्रातील बँकेच्या एका व्यापाऱ्याने सांगितले की ८१.२० च्या पातळीवर RBI चा हस्तक्षेप अतिशय आक्रमक होता. २ सरकारी बँक व्यापाऱ्यांनी देखील पुष्टी केली की RBI ने डॉलर विकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here