पैठण,दिं.२६ : विहामांडवा परिसरातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाण्याची २१ वी वार्षिक सर्व साधारण सभा चेअरमन तथा रोहयो व फलोत्पादन तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना साईटवर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मागील वर्षी मृत पावलेल्या नेत्यांना नागरिकांना श्रध्दांजली वाहुन सभेस सुरुवात करण्यात आली.प्रारंभी सभासद व ग्रामस्थ यांच्या आभार व्यक्त करून मागील वर्षीच्या सभेचा इतिवृत्तांत वाचण्यात आला. मागील तीन वर्षा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ऊस क्षेत्र अधिक झाले आहे त्यामुळे यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१-२२ च्या हंगामात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. ऊसाला २००१ रूपये भाव देवून सर्वांची देणी अदा केली. कार्यक्षेत्रात वाढत्या उसाचे क्षेत्र लक्षात घेऊन कारखान्याची गाळप क्षमता १२५० मेट्रिक टन मेट्रिक टनावरून २२०० मॅट्रिक टन करण्यात आली आहे. कारखान्यामधील विविध बदल व नवीन यंत्र सामग्रीमुळे उताऱ्यात वाढ होईल असे चेअरमन तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ चे अहवाल वाचन कार्यकारी संचालक नामदेव बावडकर यांनी केले यावेळी युवानेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार, राजू नाना भुमरे, नंदलाल काळे, रेणुका देवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर,रोहिदास रेवडकर, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णाभाऊ लबडे पाटील, किशोर चौधरी,यांच्यासह व्हाईसचेअरमन माणिकराव थोरे,संचालक सुभाष चावरे,डॉ सुरेश चौधरी,विष्णू नवथर,सुरेश दुबाले,संपत गांधले,रावसाहेब घावट,महावीर काला,लहू डुकरे,ज्ञानोबा बोडखे,सुभाष गोजरे,नंदू पठाडे,भरत पवार, कल्याण धायकर,दत्तात्रय वाकडे, मेहबूब सालार पटेल, बाबुराव पडूळे,किशोर भिसे,मच्छिंद्र जाधव,भारत दगडे,चंद्रकांत पाटील,श्रीमंत टेकाळे,रमेश झिरपे,आबासाहेब थोटे, आप्पासाहेब पेरने, सतीश देशमुख,सोमनाथ मुळे, अफसर शेख, पांडुरंग पवार, दीपक गाभुड विनोद निंबाळकर, मनोज गायके,नामदेव खरात, गणेश मडके, विष्णू वाकडे,यांच्या सह सभासद ऊस उत्पादक व शेतकरी यांची उपस्थिती होती.
फोटो
श्री रेणुका देवी शरद कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन तथा पालकमंत्री संदिपान भुमरे