रेल्वे स्टेशनला गावांची नावे न दिल्यास उरण रेल्वे उदघाटनाला ग्रामस्थ करणार विरोध.

0

 सिडको व सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचा रेल्वे प्रशासनाला इशारा.

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )

उरण तालुक्यात दोन ते तीन महिन्यात रेल्वे सेवा सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन नामकरणचा मुद्दा एरणीवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सिडको प्रशासनाने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना तसेच उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांना २९/११/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता सिडको भवन, सिबिडी बेलापूर, नवी मुंबई येथे बैठकीसाठी बोलाविले होते. बैठकीत उरण मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी जोपर्यंत रेल्वे स्टेशनला स्थानिक महसूली गावांची नावे देण्यात येणार नाही तोपर्यंत उरण मधील कोणत्याही रेल्वे स्टेशनचे उदघाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here