सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विज्ञान लेखक प्रा. प. रा. आर्डे यांनी विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची उत्कृष्ट सांगड घालून अंनिस चळवळीला वैचारिक पाठबळ पुरवले. तसेच विज्ञानाच्या नावाने चालणारी नवी बुवाबाजी छद्म विज्ञानावर आपल्या लेखनातून प्रहारही केला. अंनिस चळवळीला विवेकवादी अधिष्ठान प्राप्त करून देणेचे महत्वपूर्ण कार्य आर्डे सरांनी आयुष्यभर केले.अशा कृतज्ञतेच्या भावना आदरांजलीपर अनेक वक्त्यांनी मांडल्या.
मराठा समाज सभागृहात झालेल्या प्रा.प.रा.आर्डे यांच्या आदरांजलीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील होत्या. याप्रसंगी आर्डे यांचे शेवटचे पुस्तक, “लढे विवेकवादाचे” याचे प्रकाशन अंनिसच्या जेष्ठ कार्यकर्त्या डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तकातून जगभरातील विवेकवाद्यांची ओळख आणि त्यांचा संघर्ष आपल्याला माहिती होतो. असे पुस्तकाविषयी बोलताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या. या पुस्तकामुळे चळवळीचा विवेकवादी पाया अजून मजबूत होईल.
जेष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे म्हणाल्या, आर्डेसरांनी लिहलेली, फसवे विज्ञान, लढे विवेकवादाचे ही दोन पुस्तके ‘अनुवाद सेतू’ या आमच्या संस्थेच्या वतीने हिंदीत अनुवादित करुन आर्डे यांचे मौलिक विचार आपण देशभर पोहचवू.
प्रा.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, “आर्डे हे आयुष्यभर विवेकवादाची लढाई लढले. सध्याच्या काळात प्रतिगामी आक्रमक झालेत. अशावेळी विवेकाचा मार्ग दाखवणारे आर्डे हे आपल्यात नाहीत.त्यांनी जी भयाच्या विरोधात लढाई सुरू केली होती. ती सर्वांनी पुढे घेऊन गेले पाहिजे.” प्रा.तारा भवाळकर म्हणाल्या, “आर्डे हे चळवळीचे मध्यवर्ती खांब होते. जो खांब चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांना पेलून धरु शकत होता.”
सरोजमाई पाटील अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाल्या,”आर्डे हे आयुष्याभर दृष्टप्रवृत्तीच्या विरोधी लढले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, एन. डी. पाटील आणि आता आर्डे सरांच्या जाण्याने चळवळीचे खुप मोठे पाठबळ गेले आहे. त्यामुळे आता ही चळवळ पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अंधकार मिटवणारी ज्ञानाची पणती लावून आपण आर्डे सरांना अभिवादन करु.” यावेळी प्रा. बाबुराव गुरव, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्य सुकुमार मंडपे, आर्डे सरांची कन्या रुपाली आर्डे- कौरवार, अंनिवाचे संपादक राजीव देशपांडे, डॉ. प्रदिप पाटील, संजय बनसोडे, अभिजित पाटील आदींनी आर्डे सरांच्या अनेक आठवणी जागवल्या.”
राहूल थोरात यांनी प्रास्ताविक केले.फारुख गवंडी सूत्रसंचालन केले. विनय आर्डे यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. हमीद दाभोलकर, रमेश माणगावे, ऍड. सुभाषबापू पाटील, व्ही. वाय. आबा पाटील, ए. डी. पाटील, डॉ. संजय निटवे, प्रा. प्रविण देशमुख, वंदना शिंदे, नीशा भोसले, गणेश चिंचोले, डॉ. अरुण बुरांडे, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, अनिल चव्हाण, सीमा पाटील इ. असंख्य कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित होते.
याकामी, सुहास यरोडकर, सुहास पवार, संजय गलगले, प्रा. अमित ठकार, डॉ. सविता अक्कोळे, आशा धनाले, त्रिशला शहा, नंदू चौगुले, वाघेश साळुंखे, अमोल पाटील, अमर खोत, सुनिल भिंगे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.
फोटो : ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ.शैला दाभोळकर व मान्यवर.(छाया-अनिल वीर)