लाचलुचपत विभागाचे लावलेले अनेक सापळे फेल ? सापळा फेल करणारा तो कर्मचारी कोण?

0

तो’ पांढरा बगळा करतोय वरिष्ठांच्या आदेशानुसार वसुली ?

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी / राजेंद्र उंडे 

              अहमदनगर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहेत. मात्र सध्या लावलेले अनेक सापळे फेल कसे होतात हा संशोधनाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

           याबाबत खाञी लायक समजलेली  माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यात एक पांढरा बगळा नामक अर्थात खाकीवाल जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयातुन दर महिन्याला 25 ते 30 चे गठोडे घेऊन जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरत आहे.  यामधे एक नंबर पोलिस, दोन नंबर महसूल तर यापाठोपाठ नगरपरिषद, नगरपंचायत, कृषी विभाग, रजिस्टर, वन विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख, आरोग्य विभाग, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय व  महापालिका यासह अनेक छोट्या मोठ्या शासकीय कार्यालयातुन दर महिन्याल 25 ते 30 चे गढोडे तो पांढरा बगळा नामक कलेक्टर वसुली करुन नेत आहे. लाचलुचपत विभागाचे  हातच लाच स्वीकारत असल्याने तक्रा करायची कोणाकडे ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.ज्या विभागातुन दर महिन्याला गाठोडे मिळत आहे.त्या विभागाची तक्रार आल्यास त्या विभागाला सापळा कधी लावणार हे आधीच सांगितले जाते. त्यावेळेस संबधित अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामा निमित्त बाहेर पाठविण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सापळ्यापूर्वीच त्या विभागाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना माहिती देणारा लाचलुचपतचा तो कर्मचारी कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

       हा पांढरा बगळा या जिल्ह्यातून सुमारे ३०-४० लाख रुपये कलेक्शन करीत असल्याची महिती पुढे येत आहे. या कलेक्शन मधिल काही भाग ‘त्या’ बरीष्ठ पर्यंत पोहच होत असल्याने येथे सब मिली भगत है, असाच काहीसे दिसुन येत आहे. या पांढरा बगळा कलेक्टरला महिनाभर निव्वळ मिलिंदा गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.? यामध्ये कोणा कोणाला किती गठोडे पोहच करतो? याचाही हिशोब लवकरच समोर येणार असल्याचे समजले आहे. सध्या काही शासकीय कार्यालयात या कलेक्शन करणान्या कलेक्टरमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असल्याचे समजते. तक्रारदाराच्या तक्रारी वरुन लावलेल्या सापळा कसा अयशस्वी होतो?सापळा कोण अयशस्वी करतो हे लवकरच उघड होणार आहे.? याबाबत काही संघटनांनी केंद्रीय विभागाकडे तक्रार केली असल्याचेही समजते आहे. कुंपणच शेत खाऊ लागल्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना भेडसावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here