कोपरगाव : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सारसबाग पुणे आणि लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने नुकत्याच श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले .तसेच तालुक्यातील टाकळी येथिल एकलव्य आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ४२ बेंचेस, ४ टेबल व ५ खुर्च्या देण्यात आल्या. असल्याचेही माहिती श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी दिली.
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयास १० टेबल, १० खुर्च्या. क्रीडा साहित्य,विविध पुस्तके तसेच शिर्डी येथील साई अनाथ आश्रमाला २ पुस्तक मांडणी व विविध पुस्तके असे एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचे साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी पुणे येथील प्रसिध्द सराफ व राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंदजी राका, सारसबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल सुगंधी, झेड सी लायन्स सुधीर डागा, कोपरगाव लायन्स क्लबचे सचिव लायन्स बाळासाहेब जोरी, ट्रेझरर अंकुश जोरी,लायन्स तुलसी खुबानी, वैभव उदावंत, कैलास नागरे, लियो क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सुमित सिंनगर, धीरज कराचीवाला आदी लायन्स क्लब कोपरगावचे पदाधिकारी उपस्थित होते. विदयार्थीनी संस्कारक्षम शिक्षण घेवुन आई-वडीलांची सेवा करावी,पाश्चात्त्य पध्दतीचे अनुकरण नये असे मत प्रसिध्द सराफ फत्तेचंद राका यांनी मांडले.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे ,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,राजेश ठोळे,डॉ.अमोल अजमेरे आदीनी लायन्स क्लब ऑफ सारसबागआणि कोपरगाव यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन लायन्स राजेश टोळे यांनी तर सूत्रसंचालन लायन्स क्लब. कोपरगावचे लायन्स राम थोरे यांनी केले
या प्रसंगी लायन्स क्लब, कोपरगावचे अध्यक्ष परेश उदावंत यांनी बोलताना सांगितले की, लायन्स क्लब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे,पुढील काळात देखील समाजा प्रती आपले सेवा कार्य असेच चालू ठेवुन प्रामुख्याने रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करु अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली. या कार्यक्रमाला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,पर्यवेक्षक यु.एस.रायते,सर्व लायन्स सदस्य,शिक्षक ,विदयार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ReplyForward |