लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर यांचे कुटुंबीय कोपरगांवातील मुळ घराच्या सदिच्छा भेटीला..

0

कोपरगाव येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय राहिलेल्या लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकर यांचे कुटुंबीय अनेक वर्षांनंतर कोपरगाव शहरातील गोखरुबाबा गल्ली जवळील घराला भेटीसाठी आले होते.

सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे कडे गोदातीर परिसरातील दूर्मिळ माहिती आणि छायाचित्र यांचा संग्रह आहे.वेळोवेळी या विषयावर त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहे.गोदातीर व कोपरगाव विषयी जुनी आणि दूर्मिळ माहिती जाणून घेण्यासाठी अनेक हौशी नागरिक देशातून तसेच राज्यातून माहिती संग्राहक सुशांत घोडके यांची भेट घेत असतात. लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकर यांचे दूर्मिळ छायाचित्र आणि कौसल्याबाईंच्या जुन्या घराची भेट त्यांचे कुटुंबीयांना घडवून आणली.कौसल्याबाईंच्या कन्या कमल पटवर्धन यांना दूरुनच जुने घर दृष्टीक्षेपात पडताच त्यांचे डोळे पाणावले.कौसल्याबाईंच्या कन्या कमल यांचे समवेत रमेश पटवर्धन(नातू),दीपा पटवर्धन(नातसून),अनंत,अविनाश(पणतू),अक्षदा व अमृता (पणतूपत्नी),आयुष्यमान व ऐश्वर्या (खापरपणतू) असा मुली पासून खापरपणतूंचा हा संपुर्ण परिवार कोपरगावात आला होता.

कोपरगावचे नांव लावणी कलेत राष्ट्रीय स्तरावर नेण्यात कौसल्याबाई कोपरगांवकर यांचे मोठे योगदान आहे.कौसल्याबाईंच्या नृत्य कलेबरोबर गायकीत जादू होती.बाल गंधर्व,दादा कोंडके,शाहीर साबळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,बबन नानावडेकर(भक्तीगीत गायक),गणपत शाहीर सुंभे, प्रकाश इनामदार या सारखे दिग्गज कलाकार त्यांच्या सुरुवातीच्या काळात कौसल्याबाईंकडे अभिनय आणि गायनाचे धडे घेण्यासाठी कित्तेकदा आले होते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय राहिलेल्या कौसल्याबाई ह्या लक्ष्मीआईच्या यात्रेत मात्र कोपरगांवात येत असत.भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी कौसल्याबाई यांचा विशेष गौरव केला होता.आज कौसल्याबाई हयात नाही.परंतू त्यांच्या लावणीकला अदाकारीने कोपरगांवचे नाव उंचावले आहे.

या प्रसंगी सूर्यतेज संस्थेच्या वतीने लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकर यांचे परिवाराचा शाल, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देवून स्वागत-सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष डॉ.हिरालाल महानुभाव, कोपरगाव साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कोयटे,विद्याप्रबोधीनी शाळेचे संचालक हेमंत पटवर्धन, सोमेश्वर महादेव देवस्थानचे व्यवस्थापक जयंत विसपुते, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,लोक कलावंत रमेश टोरपे,र.म.परिख हिंदी ग्रंथालयाचे ग्रंथपाल योगेश कोळगे,प्रा.राजेश मंजुळ, लक्ष्मीबाई जोर्वेकर,सुभाष जोर्वेकर,पद्मा पवार,रुक्मिणीबाई बाभुळके,हजरा मन्सुरी,ज्योती भागवत (वाणी),मलेखा मन्सुरी,सुनीता शेळके,ॲड.सतिष बोरुडे,बिलकिज मन्सुरी,प्रकाश शेळके, नितीष बोरूडे,रजेया मन्सुरी यांचे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगावचे नांव संपूर्ण भारतात लावणी कलेच्या माध्यमातून नेणा-या लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगांवकरचे ठराविक लोकांनी केलेली जपवणूक पाहून समाधान व्यक्त केले.या लहानशाभेटीत  कोपरगावला जे प्रेम मिळाले त्याने कोपरगाव अजूनही आमचे गाव असल्याचा साक्षात्कार झाला असल्याचे सांगत गावाशी आमच्या पुढील पिढीचेही नाते जोडले गेले असल्याचे पटवर्धन(कोपरगावकर) कुटुंबियांनी सांगितले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here