लोकनियुक्त सरपंचाची मुजोरी ; निधीबाबद प्रश्न उपस्थित करणाऱ्याला वाहिली शिव्यांची लाखोली

0

संगमनेर : निधीबाबद प्रश्न उपस्थित करणाऱ्या ग्रामंस्थाला मुजोर लोकनियुक्त सरपंचाने भर ग्रामसभेत अर्वाच्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली. सदरची घटना तालुक्यातील खराडी येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी खराडीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी चत्तर यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील खराडी येथे बुधवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस सरपंच, ग्रामसेवक व ग्रांमस्थ उपस्थित होते. या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा सुरू असताना विलास रघुनाथ मोरे या ग्रामस्थाने गावच्या निधीबाबद ग्रामसेवकाकडे प्रश्न उपस्थित केला.यामुळे सरपंंच शिवाजी चत्तर संतप्त  झाले. त्यांना राग अनावर झाल्यानेेे त्यांनी या ग्रामस्थास भर ग्रामसभेत अर्वाच्य व शिवराळ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर आपण निधीबाबत ग्रामसेवकाला प्रश्न विचारला असल्याचे विलास मोरे यांनी सरपंचांना सांगितले. तू नियमाने बोल, आरोप करताना विचार  कर ,ग्रामसेवकावर आरोप करणे म्हणजे माझ्यावर आरोप केल्यासारखे आहे असे यावेळी सरपंच सांगत होते. सरपंच ग्रामसभा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. निधी कसा आला, निधी कसा खर्च केला हे विचारायचेे नाही का असा सवाल या ग्रामस्थांनी केला. यावर मी जे सांगतो तेच होतं मी शिव्या देईल नाहीतर काही पण करेल असे सांगून सरपंचांनी यावेळी संबंधित ग्रामस्थास जोरदार शिवीगाळ केली.ग्रामसभेत झालेली शिवीगाळ सहन न झाल्याने संतप्त झालेल्या   विलास मोरे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत सरपंचाविरुद्ध  तक्रार केली.मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंचांच्या विरोधात अदखलपात्र गुुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान सरपंच शिवाजी चत्तर  शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चत्तर हे लोकनियुक्त सरपंच आहेत. अशा सरपंचाने  शिवीगाळ केल्याने या सरपंचांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

चौकट :- निधीचा प्रश्न सरपंचाला का झोंबला..!

विलास मोरे या ग्रामस्थाने निधीच्या संदर्भातील प्रश्न ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला. मात्र ग्रामसेवकाने याबाबत उत्तर देण्याऐवजी लोकनियुक्त सरपंचाने थेट मोरे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे निधीचा हा प्रश्न सरपंचाला एवढा का झोबंला याबाबत उलट सुलट चर्चांना आता ऊत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here