वंचितची पाचवी यादी जाहीर ;१० मतदारसंघातील उमेदवार जाहीर ..

0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 5 वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितने 25 उमेदवारी जाहीर केले होते. आजच्या यादीतून वंचितने आणखी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर उत्तर मुंबईतून वंचितकडून उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आला आहे. 

वंचितकडून आणखी 10 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

1. दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे  अध्यक्ष अबुल हसन खान  – मुस्लीम 

2. उत्तर मुंबई – बीना रामकुबेर सिंह उमेदवार  – क्षत्रिय 

3. धाराशिव – भाऊसाहेब आंधळकर – लिंगायत 

4. रायगड –  कुमुदानी चव्हाण – मराठा 

5. उत्तर पश्चिम मुंबई – संजीव कुलकोरी – ब्राम्हण 

6. दिंडोरी  – गुलाब बरडे – भिल

7. पालघर – विजया म्हात्रे – मल्हार कोळी – 

8. भिवंडी – निलेश सांबरे – हिंदू कुंबी

9. नंदुरबार – हनुमंत सुर्यवंशी – टकरे कोळी 

10. जळगाव – प्रफुल्ल लोढा – जैन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here