वंचित घटकांच्या आर्थिक उन्नतीत स्नेहलताताई कोल्हे यांचा सिंहाचा वाटा_ साहेबराव रोहोम.

0

कोपरगांव दि. ९ ऑक्टोबर 2022

भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी वंचित घटकाबरोबरच गोर-गरीब, उपेक्षीत महिलांच्या आर्थिक उन्नतीत मोलाचा सहभाग दिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले. तालुक्यातील मौजे शिरसगांव व कोळपेवाडी येथे सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, उत्तमराव चरमळ, अंबादास पाटोळे यांची भाषणे झाली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले यांनी सौ. कोल्हे यांच्या विधानसभा काळातील विकास कामांची माहिती दिली.  तर कोळपेवाडी येथे संजीवनीचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांवसह संजीवनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढविण्यांवर भर दिला.   संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कार्य क्षेत्रातील उसाचे उत्पादन वाढीसाठी धडक मेळावे घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जात मार्गदर्शन केले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे आधुनिक विचारसरणीचे माध्यमांतून युवा शक्तीला उभारी देतात असे संचालक राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, सोपानराव पानगव्हाणे यांनी सांगितले. 

            याप्रसंगी एल-डी. पानगव्हाणे, शब्बीरभाई शेख, पुंजाजी राऊत, बाबासाहेब पानगव्हाणे यांची भाषणे झाली.  याकार्यक्रमप्रसंगी त्रिंबकराव सरोदे, शिवाजीराव भगुरे, रावसाहेब जाधव, शिवाजीराव जाधव, अशोकराव गायकवाड, अशोक भानुदास पा. शिंदे, अशोक निवृत्ती पा. शिंदे, किसन गव्हाळे, संतोष भागवत, प्रकाश शिंदे, सुदाम कर्पे, सुदाम शिंदे, आप्पासाहेब शिंदे, रंजन साळुंके, आप्पासाहेब रांधवणे, हबिबभाई पटेल, केशवराव गायकवाड, प्रकाश गव्हाळे, दत्तू पाटोळे, आसाराम गव्हाळे, दादा पा. सुंभे, परसराम गव्हाळे, वाल्मिक भुजाडे, कैलास पाटोळे, मनोज तुपे, परशराम पा. वाबळे, भाऊसाहेब पा. कोळपे, शिवाजी कदम, नानासाहेब पंडोरे, बाबासाहेब निंबाळकर, राजेंद्र कोळपे, किरण कोळपे, वसंतराव लकडे,बाबासाहेब कोळपे, पोपटराव जुंधारे, सुखदेव कोळपे, भिकनराव कोळपे, शब्दीरभाई शेख, प्रकाशराव जुंधारे,अशोक ढोणे, अर्जुन कोळपे, म्हाळु कोळपे, पोपटराव निळकंठ, भगवानराव मोकळ,रामनाथ कोळपे, कृष्णकांत गवळी, वसंतराव कुलकर्णी, वसंतराव पानगव्हाणे, संतोष जाधव, प्रवीण पानगव्हाणे, अमोल गवळी, प्रशांत वाबळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिरजगाव कोळपोळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शब्बीर भाई शेख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here