वर्ड बुक डेच्या निमित्ताने तेजूकाया महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

0

सिन्नर : वर्ड बुक डे चे औचित्य साधून श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालय स्थानिक समिती अध्यक्ष मा. विलास धुर्जड यांच्या शुभ हस्ते व प्राचार्य डॉ .एस . एस . काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सेवक संचालक डॉ . संजय शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव – एस .बी . देशमुख प्रा. टी .एस .ढोली  सिन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या प्रसंगी बोलताना माननीय विलास धुर्जड  यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा व संदर्भ ग्रंथाचा जास्तीत जास्त वापर करून वाचनाकडे कल वाढवावा असे सांगितले. प्राचार्य डॉ . एस एस काळे यांनी महाविद्यालयातील ग्रंथसंपदेची माहिती देऊन ई लायब्ररीच्या सुविधेबाबत मार्गदर्शन करून महाविद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी ऑफलाईन व ऑनलाईन पुस्तकांच्या वाचनावर जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्या ज्ञानात भर टाकावी असे आवाहन या निमित्ताने केले.

मुख्याध्यापक सघाचे सचिव एस बी देशमुख यांनी वाचाल तर वाचाल हा उपक्रम महाविद्यालयाने वर्षभर सुरू ठेवावा व वाचन संस्कृती वाढवावी.उद्घाटनानंतर महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी  व शिक्षकेत्तर सेवकांनी ग्रंथालय प्रदर्शनास भेट दिली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्रीमती वारे मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here