वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला फाटा; आदर्श कन्यारत्नांचा सन्मानाचा पायंडा

0

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ पिंगळे परिवाराकडून उपक्रम

येवला प्रतिनिधी :

 वर्षश्राद्ध हा विधीचा आपल्याकडे पारंपरिक कार्यक्रम केला जातो.या प्रथांना फाटा देत नाटेगाव येथील पिंगळे कुटुंबीयांनी रेशमबाई निवृत्ती पिंगळे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या आदर्श कन्यारत्नांचा सन्मान करून नवा पायंडा घातला आहे. आईच्या स्मरणार्थ तात्याबा पिंगळे व त्यांची मुले मुकुंद व गोवर्धन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाची परिसरात चर्चा होत आहे. “सावित्रीचा दिव्य वारसा समर्थ अपुल्या हाती, संघर्षातून तुम्ही मिळविले धनविद्येचे मोती” या उक्तीप्रमाणे प्रज्ञावंत आदर्श कन्या सन्मान सोहळा नाटेगाव येथे संपन्न झाला.

आईची आठवण म्हणून स्त्री शक्तीला समर्पित हा कार्यक्रम झाला.याप्रसंगी वैद्यकीय,अभियांत्रिकी,संशोधन,शिक्षण,कृषी,बँकिंग, सामाजिक कार्य अशा क्षेत्रात कार्यरत ९ आदर्शकन्यांचा सन्मान  करण्यात आला. कार्यक्रमासाठी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्‌गुरु जनार्दन स्वामी(मौनगिरीजी)महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.तर माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे,संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले. यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील,सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अरूण येवले,श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक विकास भागवत,परिवार निधी बँकेचे अध्यक्ष धोंडीराम आप्पा रायते, यांसह जय बाबाजी भक्त परीवार,महाराष्ट्र माझा परिवारचे सदस्य, नातेवाईक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी स्वरसिंधुरा संगीत मंचाचे प्रा.राहुल शिंदे व सहकाऱ्यांनी ‘आई’वर सुंदर गीते गायली.

—–

यांचा झाला सन्मान

अमृता वसंतराव पवार(सामजिक),डॉ.स्नेहा गणेश वाणी- काळे (वैद्यकीय),इंजि.प्राप्ती विश्वनाथ शेळके(अभियांत्रिकी संशोधन),सौ.मीना संदीप शिंदे(साहित्य)ॲड.कांचन कमलाकर गोडसे(विधी व न्याय),दिपाली साईनाथ तिपायले (शिक्षण), कोमल अण्णासाहेब मोरे (माहिती तंत्रज्ञान),प्रतिक्षा लक्ष्मण मोरे (कृषी शिक्षण)सौ.प्रियंका सतिष इंगळे (बँकिंग)

——–

प्रतिक्रिया:

आईसारखी श्रेष्ठ फक्त आईच असते. अशा आईच्या स्मृती जागवण्यासाठी भावस्पर्शी सोहळा हा झाला. पुण्यस्मरण कार्यक्रमात नवा पायंडा या कुटुंबीयांनी घातला आहे.त्यामुळे समाजात आदर्श काम करणाऱ्या महिलांना हा सन्मान प्रेरणा देईलच शिवाय ज्या ज्या वेळी या कार्यक्रमाची चर्चा होईल त्यावेळेस आईची आठवण नक्कीच होईल. समाजात स्त्रीशक्तीचा सन्मान वेगवेगळ्या व्यासपीठावरून होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here