वर्षातून एखदा तरी  धम्म पर्यटनास भेट द्यावी.

0

सातारा : अनेक पर्यटन स्थळांना आपण भेट देत असतोच.तेव्हा आपले दैवत असणारे माता रमाई यांच्या माहेरी वनंद येथे स्मारक व सभागृहातील अमूल्य ठेवा आहे. तेव्हा धम्मबांधवांनी आपल्या परिवारासह किमान वर्षातून एखदा तरी एखाद्या तरी धम्म पर्यटनास भेट द्यावी. असे आवाहन ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे यांनी केले.

     येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा विनिमय करण्यात आला. तेव्हा कांबळे मार्गदर्शन करीत होते.   प्रारंभी,भाऊ धाइंजे व अशोक भोसले यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. माणिक आढाव,बी.एल. माने, गौतम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

    महाडचे चवदार तळे,रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या बाबासाहेब यांच्या गावी स्थळांना भेटी देणे गरजेचे आहे.नको त्या ठिकाणी आपण भेट देत असतो. तेव्हा दिक्षाभूमी,चैत्यभूमी आदी देश-विदेशातील धम्म सहलीमध्येही सहभागी झाले पाहिजे.अशा पद्धतीने अन्य विषयावर चर्चाविनीमय झाला. याशिवाय, धम्मबांधव उत्सव कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक  शाहिर माधव भोसले यांनी अखेरपर्यंत धम्म मार्गदर्शन करून  आपल्या शाहिरांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले होते.त्यामुळे त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली आहे. असल्याबाबतही भाऊ धाइंजे, अनिल वीर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदरच्या चर्चेत हृषीकेश जाधव, अशोक जाधव,तात्याराम जाधव आदि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.

फोटो : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here