वाढीव घरपट्टीच्या विरोधातील भाजप, शिवसेना व रिपाइंचे साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

0

 -विविध संस्था, संघटना व नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

कोपरगाव : दि. २९ सप्टेंबर २०२२(वार्ताहर)

               कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केली असून, ही अवास्तव वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने २७ सप्टेंबरपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. आज तिसऱ्या दिवशी गुरुवारीही हे उपोषण सुरूच होते.

             कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत शहरातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करून घेतला; परंतु आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केलेले असताना त्याची दखल न घेता आणि या कंपनीने दिलेल्या सदोष अहवालाच्या आधारे सन २०२२-२३ साठी घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. मालमत्ताधारकांवर लादलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी, मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला नगर परिषदेने दिलेले ७५ लाख रुपये परत घ्यावेत, या कंपनीविरुद्ध नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा, या कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे आदी प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २७ सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

              वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणीचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांच्या जिव्हाळ्याच्या घरपट्टीवाढीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. 

         या उपोषणास कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी खामकर, ॲड.अशोक टुपके, ॲड. योगेश खालकर, ॲड. मनोहर येवले, ॲड. महेश भिडे, ॲड. दीपक पवार, ॲड. ए. एस. आगवण, ॲड. मोकळ, ॲड. विलास गिरे आणि इतर वकील मंडळींनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी बोलताना ॲड. योगेश खालकर यांनी नगरपालिकेने मागील दराप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी. घरपट्टीचा विषय हा संपूर्ण कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले. 

          ॲड. मनोहर येवले यांनी नगरपालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा पाठवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत हवालदिल झाले आहेत. आपण एकटे काही करू शकत नाही असे त्यांना वाटत होते; परंतु आपण त्यांना लढण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले; त्यामुळे त्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. या प्रश्नात कायदेशीर लढाई करण्याची वेळ आल्यास आम्ही सर्व वकील मंडळी नागरिकांना विनामूल्य कायदेशीर मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.  

            कोपरगाव शहर डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. विजय क्षीरसागर, डॉ. अभय दगडे, डॉ. नरेंद्र भट्टड, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. बंब आदी अनेक डॉक्टरांनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंब, विभूते नाना यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. 

         कोपरगाव ब्राह्मण सभेचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष गोविंद जवाद, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीश लहुरीकर, डॉ. मिलिंद धारणगावकर, जोशी मामा, मिलिंद जोशी आदींनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला.    

            कहार समाज व भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष अर्जुन भाऊसाहेब पंडोरे, राहुल गोकुळ गंगुले, सचिन रामभाऊ लचुरे, संदीप बाळू पंडोरे, सुरज सुभाष लोखंडे, सुरज तुकाराम मेहेर, हिरालाल लकारे, राजेंद्र गंगुले, जनाबाई पंडोरे, मुकेश डिंबर, सचिन गंगुले, अमरचंद कुंढारे, सागर गंगुले, विशाल लकारे, पंडित पंडोरे, विठ्ठल पंडोरे, राजेंद्र मेहेरे, अशोक कंदे, विनोद जिरे, ईश्वर पंडोरे, प्रसाद पऱ्हे व इतर अनेक भाजी विक्रेत्यानी या उपोषणाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. 

          तसेच कहार समाज युवा परिवार ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गंगुले, उपाध्यक्ष गणेश गंगुले, खजिनदार ईश्वर लकारे, पदाधिकारी तुकाराम गहिरे, ईश्वर पंडोरे आदीनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. 

              कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयाचे (एस. जी. विद्यालय) मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, उपमुख्याध्यापक गायकवाड व शिक्षक वर्ग, अहिर सुवर्णकार समाज (कोपरगाव) चे अध्यक्ष पंडित बाबुराव यादव, माजी उपनगराध्यक्ष अनिल जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, अरुणशेठ बागुल, भाऊसाहेब बागुल, अशोक दुसाने आणि इतर अनेक समाजबांधवांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. कोपरगाव सिव्हील इंजिनीअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी रोहित वाघ, सोमेश कायस्थ, संदीप राहतेकर, प्रदीप मुंदडा, शिरीष दुबे व इतर सदस्य, लक्ष्मीनगर येथील संघर्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे आणि इतर पदाधिकारी, अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंक एम्प्लॉईज युनियन व पीपल्स बँक कर्मचारी युनियनचे पदाधिकारी प्रदीप नवले, आशीष रोहमारे, निखिल निकम, बबन ससाणे, प्रवीण भुजाडे, के. एस. लांडे व इतर सदस्य, गॅरेज असोसिएशन. खंदक नाला, कोपरगावचे पदाधिकारी अशोकराव भांगरे, माधवराव धुमाळ, प्रकाश शेळके, रवींद्र कदम, वामनराव कदम, रुपेश पहिलवान, संतोष चौधरी, संजय बोरसे, शैलेश रावळ, रावसाहेब साठे, हुराभाई पठाण व इतर पदाधिकारी.

        कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन हाशम चाँद पटेल व इतर सदस्य, हमाल पंचायतचे कार्याध्यक्ष वाल्मिक जगन्नाथ कदम व इतर पदाधिकारी, कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक श्यामराव लकारे, अर्जुन रघुनाथ मोरे, विजय बुधा मोरे व इतर सदस्य.

         अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शकीलाभाभी रहिमखान पठाण व इतर महिला सदस्य, कुरेशी ग्रुप, संजयनगरचे पदाधिकारी मोबीन खालिक कुरेशी, इरफान खालिक कुरेशी, इम्रान खालिक कुरेशी, अयान सरदार कुरेशी, रईस राजू खाटिक, तौफिक अकिल अत्तार, रहेमान राजू अत्तार, इरफान हसन कुरेशी, जमीर जाफर कुरेशी, वाजीद करीम कुरेशी, मुन्तजीर रऊफ कुरेशी, सलीम जमाल कुरेशी, लंबू जमाल कुरेशी, नदीम मुन्तजीर कुरेशी, इलियास खाटिक, सलीम इंदुरी व इतर सदस्य, अंबिका तरुण मंडळ, शनी मंदिर परिसरचे अध्यक्ष विनायक मुरलीधर गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here