विकासाच्या आड येणाऱ्या अपप्रवृत्तींना भिक घालत नाही : आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करीत असतांना गटातटाचे राजकारण नेहमी बाजूला ठेवत मी लोकप्रतिनिधी संपूर्ण मतदार संघाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकाच्या विकासाला प्राधान्य दिले व यापुढेही देणार आहे. मात्र मतदार संघाचा होत असलेला विकास आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटत असल्याचे काहींना सहन होत नाही. त्यामुळे विकासात राजकारण आणून विकासालाच आडवे येण्याचा प्रयत्न होत असला तरी विकासाच्या आड येणाऱ्या अशा अपप्रवृत्तीना आज पर्यंत कधीही भिक घातली नाही व यापुढेही घालणार नाही अशा शब्दात आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना  ईशारा दिला आहे.

कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत ६० लक्ष ८५ हजार रुपये निधीतुन करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ व नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ९ लक्ष ७५ हजार रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचा उदघाटन समारंभ नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.  

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सार्वजनिक विकासकामांचा फायदा हा मर्यादित नागरिकांना होत नसून तो सर्व नागरिकांना होत असतो त्यामुळे मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देतांना कधीही दुजाभाव केला नाही आणि करणार नाही. मात्र नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करून कुठे तरी विकासकामात आडवे यायचे असा काहींना छंद असतो. जनतेने संधी देवून देखील त्यांना विकास करता आला नाही अशा विघ्नसंतोषी प्रवृत्ती विकासाच्या आड येण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसून आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही कर्मवीर शंकररावजी काळे यांचे विकासाचे समाजकारण करीत असलो तरी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या तालमीत तयार झालो असून जशास तसे उत्तर देण्याची आमची नेहमीच तयारी असते हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. सरकार बदलले असले तरी विकास कामे थांबणार नाही. सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वी होत असलेला पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील. विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील सत्ताधारी पक्षाकडून निधी आणण्यासाठी बांधील असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यावेळी कोल्हे गटाचे बाजीराव होन, दादासाहेब दहे, दीक्षित दहे, संदीप दहे, सुनील होन, आप्पासाहेब ढमाले, दौलत दहे, सचिन ढमाले, राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, विष्णू शिंदे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, आनंदराव चव्हाण, मच्छिन्द्र दहे, भिवराव दहे, धर्मा दहे, बाळासाहेब पवार, नंदकिशोर औताडे, विक्रम बाचकर, शिवाजी दहे, धनराज पवार, भानुदास दहे, बाबासाहेब होन, अक्षय दहे, मंसालाल दहे, योगेश दहे, केशवराव दहे, वाल्मिक दहे, अर्जुन दहे, प्रकाश दहे, गंगाराम गायकवाड, आप्पासाहेब दहे, दत्तात्रय दहे, भाऊसाहेब बढे, मोहन होन, किरण पवार, रोहिदास शाख, विठ्ठल पवार, रतन दहे, किसन काटकर, भाऊ पवार, गौतम दहे, माऊली दहे, पंढरीनाथ गायकवाड, दिनेश गायकवाड, प्रमोद दहे, राजु गायकवाड, संजय गायकवाड, कैलास पवार, केशव बढे, रमेश होन, कर्णा होन, विजय चव्हाण, आदित्य बढे, भाऊसाहेब दहे, मिथुन दहे, विलास दहे, ठकाजी गायकवाड, ज्ञानेश्वर दहे, साहेबराव दहे, कल्याण ढमाले, पोपट गायकवाड, संदीप ढमाले, अनिल दहे, दगु गायकवाड, द्वारकानाथ दहे, जालिंदर बढे, बापूसाहेब दहे, सागर पवार, दत्तू पवार, धर्मा चंदनशिव, संदीप पवार, पांडुरंग कुदळे, रतन भवर, ज्ञानेश्वर शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,अभियंता चांगदेव लाटे, शाखा अभियंता अश्विनजी वाघ, राजेंद्र दिघे, ग्रामसेवक महेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – डाऊच बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व ओपन जिम साहित्याचा उदघाटन समारंभ प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here