विनोद वीरांच्या हास्य जत्रेने संगमनेरच्या जयंती महोत्सवाची सांगता

0
संगमनेर  :  मराठी चित्रपट व विविध मालिकांमधील  कलाकारांच्या दमदार अभिनयाने साकार झालेल्या  हास्य जत्रा या कार्यक्रमातील विनोदविरांनी संगमनेरकरांना पोटदुखे पर्यंत खळखळून हसवले. विक्रमी गर्दीत झालेल्या या हास्य जत्रेने संगमनेरच्या जयंती महोत्सवाची उत्साहाात सांगता झाली.
            सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित हास्य जत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ हसमुख जैन, बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सुवर्णाताई मालपाणी, सौ शोभाताई कडू यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
         या कार्यक्रमासाठी शालू फेम विनोद वीर प्रभाकर मोरे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, ओंकार राऊत ,वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, सोनी मराठीची विजेती गायिका श्वेता दांडेकर, गायक प्रतीक सोळसे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने, कार्यकारी निर्माता दशरथ शिरसाट, श्याम बांगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डोंगरावरील वृक्षारोपणाचा धमाल विनोदी कार्यक्रम झाला. यानंतर अपेक्षा लोंढेंनी सादर केलेल्या लावणी फ्युजन मध्ये चंद्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. प्रभाकर मोरेच्या शालू या गाण्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तर पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि शिवाली परब यांच्या मोना डार्लिंग या छोट्याशा नाट्यछटेने प्रेक्षकांना खळखळून हसवले. श्वेता दांडेकर आणि प्रतीक सोळसेने गायलेल्या विविध गीतांना तरुणांनी प्रचंड दाद दिली. तर प्रभाकर मोरे, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने यांची चित्रपट शूटिंग या कॉमेडी नाटकाने धमाल केली.
या प्रसंगी आ. थोरात म्हणाले की, संगमनेर ही कलावंतांची भूमी आहे. कायम संत आणि कलावंतांचा या ठिकाणी आदर होतो. जयंती महोत्सवातून प्रबोधन, प्रेरणा, मार्गदर्शन, मनोरंजन असे विविध वैचारिक कार्यक्रम होत असतात. तरुणांच्या करिअरसाठी झालेले कार्यक्रम ही संस्मरणीय ठरले आहे. दरवर्षी संगमनेरकर या जयंती महोत्सवाची आवर्जून वाट पाहत असतात. मागील दोन वर्ष कोरोनामुळे आपल्याला हा महोत्सव करता आला नाही. परंतु यावर्षी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे ही ते म्हणाले.
आकर्षक बैठक व्यवस्था, भव्यदिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, एलईडी स्क्रीन हे या जयंती महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. हा जयंती महोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला आहे. या कार्यक्रमाचे आभार  एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष  कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी मानले.

चौकट :- बाळासाहेब थोरात गाण्यावर तरुणाईचा जल्लोष
मराठीतील आघाडीचे संगीतकार व गायक अवधूत गुप्ते यांनी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वावर गायलेल्या बाळासाहेब थोरात या गीताची क्रेझ युवकांमध्ये मोठी असून हे गीत सुरू होताच संगमनेर मधील तरुणाईने प्रचंड जल्लोष केला. याचबरोबर आ. डॉ सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांनीही या गाण्यावर उपस्थित कार्यकर्ते व तरुणांसह ठेका धरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here