वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान विसरून चालणार नाही – सौ. पुष्पाताई काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- जगासह आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांची वर्तमान पत्रात प्रसिद्ध होणारी इंतभूत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचाविण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. प्रगत तंत्र ज्ञानाच्या युगात एका क्लिकवर सर्व गोष्टी उपलब्ध होत असतांना वृत्तपत्रांची विश्वासहर्ता आजही टिकून आहे यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचे असलेले योगदान विसरून चालणार नाही असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.

          वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नुकताच कोपरगाव येथे यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे हे नेहमीच अशा सत्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. मात्र आ. आशुतोष काळे हे महत्वाचे कामासाठी बाहेरगावी असल्यामुळे सत्कार माझ्या हातून होत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा घराघरात दूरदर्शन संच आला तेव्हापासून आजतागायत बोलले जाते की वृत्तपत्र व्यवसायाला धोका असून वृत्तपत्र बंद पडतील मात्र हे कदापी शक्य नाही. आजपर्यंत जी विश्वासहर्ता वृत्तपत्रांनी जपली आहे ती शाश्वत विश्वासहर्ता इतर माध्यमांकडे काही प्रमाणात कमी असून समाजात घडणाऱ्या बारीक बारीक गोष्टी देखील वृत्तपत्रांच्या माध्यमातून माहिती होतात त्यामुळे  वृतपत्र कधीच बंद पडणार नाही. ऊन, वारा,पाऊस याची तमा न बाळगता वर्षातील बोटावर मोजण्याएवढे दिवस सोडले तर अखंडपणे वृत्तपत्र विक्रेते देत असलेली सेवा अभिमानास्पद असल्याचे गौरवद्गार सौ. पुष्पाताई काळे यांनी यावेळी काढले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, कोपरगाव तालुका वृत्तपत्र विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, उपाध्यक्ष हरीभाऊ देवरे, खजिनदार राजेश हाबडे, कार्याध्यक्ष प्रशांत चिमणपुरे, सचिव महेंद्र टोरपे, संतोष पवार, रविंद्र काळणे, रविंद्र दातीर, शंकर हिंगमिरे, प्रकाश देवरे, सतिष जाधव, अजय निकम, किरण निकम, दिलीप हिंगमिरे, लक्ष्मण कांचन, श्रीकांत पिंपळे, संजय कोपरे, लक्ष्मण परदेशी, गोरख विघे, पाराजी रघुवंशी, माणिक उगले, प्रकाश शिंदे, संजय भोसले, दत्तात्रय देशमुख, पुंडलिक नवघरे, दादासाहेब औताडे, राजेश गाडे, आदींसह माजी नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, माजी नगरसेवक दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, सौ. नेत्रा कुलकर्णी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र खैरनार, शुभम लासुरे, राजेंद्र आभाळे, अक्षय आंग्रे, चांदभाई पठाण, किरण बागुल, अविनाश ताम्हाणे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ-  वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी सौ. पुष्पाताई काळे समवेत मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here