व्याजाच्या पैशासाठी खाजगी सावकाराची रिक्षा चालकास उचलून नेऊन मारहाण !

0

सावकारासह चौघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपी फरार

जामखेड तालुका प्रतिनिधी  :

    जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खाजगी सावकारी विरूद्ध केलेल्या धडाकेबाज कारवाई नंतर थंड झालेल्या सावकारांनी पुन्हा डोके वर काढले असून  आठवड्यातील सावकारीची पुन्हा ही दुसरी घटना घडली आहे. यावरून जामखेडमध्ये पुन्हा खाजगी सावकारांनी डोके वर काढले असून दि. २५ सप्टेंबर रोजी व्याजाच्या पैशाच्या कारणावरून आणखी एका खासगी सावकाराने आपल्या तीन साथीदारांमार्फत रिक्षा चालक आबेद शेख याला जामखेड बसस्थानक येथून उचलून नेऊन कुसडगाव रोडला असलेले हॉटेल जगदंबा येथे मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती असे की, जामखेड बसस्थानक येथे रिक्षा जवळ उभा असताना आरोपी पप्पू कात्रजकर हा आपल्या तीन साथीदारांना घेऊन तेथे आला व फिर्यादीस म्हणाला की तु माझ्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतलेले आहेत. त्याचे व्याजाचे दोन लाख रुपये तुझ्याकडे राहिले आहेत. ते मला आत्ताचे आत्ता पाहिजेत ते मला लगेच दे असे म्हणाला व यावेळी फिर्यादी आबेद शेख हा आरोपीला म्हणाला तुला दहा हजार रुपये व त्याचे व्याज आज पर्यंत ठरलेल्या हप्ता प्रमाणे दिले आहे व त्यास मुद्दलाचे व व्याजासह असे एकुण तुला ३६००० रुपये दिले आहेत माझ्याकडे तुझे पैशाची कसलीही बाकी नाही असे म्हणाले तेंव्हा आरोपी पपु कात्रजकर मला म्हणाला तुझ्या कडे कशी काय पैसे बाकी नाही व त्याला राग आल्याने  आरोपी पप्पू कात्रजकर व त्याच्या सोबत आलेले तीन अनोळखी इसमानी त्यांचे पांढऱ्या रंगाच्या पोकलेन व जेसीबी डिझेल वाहतुक बोलेरो गाडीमध्ये बळजबरीने बसून फिर्यादीस मारहाण केली व कुसडगाव येथील जगदंबा हॉटेल येथे घेऊन गेले व तेथे आरोपी पप्पू कात्रजकर व तीन अनोळखी इसमांनी आबेद शेख यास घाण घाण शिवीगाळ, दमदाटी करून बेल्टने व लाथा बुक्क्याने मारहाण केली यात शेख हे किरकोळ जखमी झाले. यानुसार फिर्यादी आबेद खलील शेख (वय ३५ वर्षे) धंदा रिक्षा चालक रा. सदाफुले वस्ती ता.जामखेड यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून यातीलं आरोपी पप्पू कात्रजकर रा. कुसडगाव व तीन अनोळखी इसम (नाव पत्ता माहीत नाही) यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम ३६३, ३२४, ३२३, ५०४, ५०५, ३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही आरोपी फरार आहेत सदर घटना दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान  कुसडगांव येथील हॉटेल जगदंबा येथे घडली आहे. 

    पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here